Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दिव्या देशमुखच्या खेळताना टेबलवर केळं का होतं? ड्रेस सिलेक्शनच कारणही सांगितलं

19 वर्षीय दिव्या देशमुखने फिडे महिला चेस वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. दिव्या देशमुखने मिळवलेल्या या विजयाचं सगळीकडे कौतुक होतंय. पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. 

दिव्या देशमुखच्या खेळताना टेबलवर केळं का होतं? ड्रेस सिलेक्शनच कारणही सांगितलं

FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या दिव्या देशमुखने म्हटले आहे की, पालकांनी अपयशाच्या वेळी आपल्या मुलांना साथ दिली पाहिजे. दिव्या देशमुख म्हणाल्या, 'FIDE २०२५ जिंकल्यानंतर मला खूप बरे वाटत आहे. मी जिंकलो आहे हे मानण्यास मला वेळ लागला. माझा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात अनेकांनी योगदान दिले आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माझे पालक, कुटुंब आणि माझे पहिले प्रशिक्षक राहुल जोशी यांना देऊ इच्छिते.'

(हे पण वाचा - वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखच्या हातातील 'तो' फोटो कोणाचा?)

केळं सोबत घेण्याचं कारण काय? 

दिव्या देशमुखच्या सामन्याची देखील जोरदार चर्चा झाली. यादरम्यान तिच्या खेळासोबतच दोन गोष्टींबाबत चाहत्यांना प्रश्न पडले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न असा की, दिव्या देशमुखने टेबलावर केळं का ठेवलं होतं? जेव्हा दिव्या देशमुख खेळासाठी खुर्चीवर बसली तेव्हा तिने आपल्यासोबत पाण्याची बॉटल आणि केळं घेतलं होतं. पाण्याची बॉटल सुरुवातीला खाली आणि नंतर टेबलावर ठेवून तिने केळं देखील ठेवलं. या संपूर्ण खेळात तिच्यासोबत केळं होतं. त्यामागचं कारण काय असं तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं. 

यावेळी दिव्या देशमुखने दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे. दिव्या म्हणाली की, मी अनेकदा खेळात इतकी गुंतून जाते की, खाण्याचं राहून जातं. रिमांडर म्हणून मी ते केळंसोबत ठेवायची. मी खेळायला बसतानाच केळं सोबत ठेवते जेणेकरुन ते खायचं मला लक्षात राहील. पण ते कधीच होतं नाही केळं दरवेळी खायचंच राहत नाही. 

'तोच' ड्रेस का निवडला? 

तो ड्रेस मी निवडला कारण याआधी मी जेव्हा खेळले तेव्हा मी जिंकले होते. त्यामुळे तोच विचार डोक्यात ठेवून मी या दिवशी घातला, असं दिव्या सांगते. 

आईला का शोधत होती? 

दिव्या देशमुखने सांगितले की, सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की मी FIDE जिंकले आहे. ग्रँडमास्टर हे पद मी पटकावलं आहे. त्यानंतर जेव्हा या सगळ्याची जाणीव झाली तेव्हा माझ्या मनात असंख्य भावना उफाळून आल्या. आणि मी आईला शोधू लागली. 

Read More