Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS ENG : जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौरा अर्ध्यातच का सोडला? वर्कलोड नाही तर 'हे' होतं कारण

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियातून जसप्रीत बुमराहला रिलिज करण्यात आलं. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

IND VS ENG : जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौरा अर्ध्यातच का सोडला? वर्कलोड नाही तर 'हे' होतं कारण

IND VS ENG Test : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला इंग्लंड विरुद्ध पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियातून रिलीज करण्यात आलं आहे. वर्क लोड मॅनेजमेंटमुळे बुमराह हा भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात होणाऱ्या 5 सामन्यांपैकी केवळ 3 टेस्ट सामने खेळणार हे हेड कोच गौतम गंभीरने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार बुमराहने तीन सामने खेळले. चौथ्या सामन्यात बुमराहने गोलंदाजी केली, पण पाचवा सामना भारतासाठी सीरिज बरोबरीत आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे बुमराह कदाचित या सामन्यात प्लेईंग 11 चा भाग असेल अशी अपेक्षा होती. पण तसं झाली नाही आणि बीसीसीआयने (BCCI) माहिती देऊन बुमराहला इंग्लंड दौऱ्यातून रिलीज करत असल्याचे सांगितले. अनेकांना बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे रिलीज करण्यात आलं असं वाटलं पण यामागचं नेमकं कारण आता समोर आलंय. 

बुमराहला का केलं रिलीज?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 31 जुलै रोजी मीडिया ब्रिफमध्ये सांगितलं की, बुमराहला पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी रिलीज करण्यात आलंय. बुमराहला आराम देण्यात आला होता तर त्याला रिलीज करण्यात का आलं असा प्रश्न अनेकांना पडला. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार बुमराहला रिलीज करण्यातचं कारण त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, 'दुर्दैवाने बुमराहच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. चांगली गोष्ट ही की ही दुखापत जास्त गंभीर नाही. त्यामुळे यावर सर्जरीची आवश्यकता नाही. BCCI ची मेडिकल टीम सध्या त्यांच्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहे. 

भारतात आल्यावर बुमराह कुठे जाणार?

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की 31 वर्षांचा बुमराह हा बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये रिहॅब सुरु करेल. बुमराहच्या अनुपस्थितीत सुद्धा भारतीय संघाच्या गोलंदाजांनी ओव्हलमध्ये चांगलं प्रदर्शन केलं, पण बुमराह असता तर त्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच झाला असता असं मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केलंय. भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं लक्ष दिलं. यादरम्यान इंग्लंडच्या 6 विकेट घेण्यात भारतीय संघाला यश आलंय. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 तर भारतीय संघाला विजयासाठी 4 विकेट्सची आवश्यकता आहे. 

हेही वाचा Ind vs Eng: 'भारताकडून एकच चूक झाली...,' आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'इतकी मोठी धावसंख्या उभारुन...'

 

टीम इंडियासाठी करो या मरो सामना : 

भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये आतापर्यंत 1 सामना हा भारताने, 2 सामने इंग्लंडने जिंकले. तर एक सामना हा ड्रॉ झाला. त्यामुळे इंग्लंड सध्या 1-2 ने आघाडीवर आहे. तेव्हा भारताला शेवटचा टेस्ट सामना हा काहीही करून जिंकावा लागेल अन्यथा इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवेल. 

FAQ : 

पाचव्या टेस्टसाठी भारताची प्लेईंग 11 कशी आहे?

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज

पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 कशी आहे?

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, गस अ‍ॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग

भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकेल?

ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 15 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ दोन सामने टीम इंडियाने जिंकलेत.

 

Read More