Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद शमीला संधी का दिली नाही? 3 मोठी कारणं आली समोर

IND VS ENG : चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली, यावेळी असे अनेक स्टार क्रिकेटर्स होते ज्यांना टीम इंडियात स्थान मिळालं नाही. ज्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचाही समावेश होता. 

इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद शमीला संधी का दिली नाही? 3 मोठी कारणं आली समोर

Mohammad Shami : जून महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी बीसीसीआयने शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली असून रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल. चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली, यावेळी असे अनेक स्टार क्रिकेटर्स होते ज्यांना टीम इंडियात स्थान मिळालं नाही. ज्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचाही समावेश होता. शमीला भारताच्या टेस्ट संघात संधी न मिळाल्याने त्याच्या अनेक फॅन्सना आश्चर्य वाटले. मात्र यामागची कारण काय असू शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

2 वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना : 

34 वर्षांच्या मोहम्मद शमीने त्याचा शेवटचा टेस्ट सामना हा इंग्लंडमध्येच खेळला होता. 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली होती. शमीने भारताच्या टेस्ट संघासाठी अनेकदा महत्वाची कामगिरी केली होती, 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, ज्यात भारत उपविजेता ठरला. सर्जरीनंतर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने यशस्वी पुनरागमन सुद्धा केले. त्यातही त्याने उत्तम कामगिरी केली होती. 

हेही वाचा : 'कदाचित त्याला...', विराटच्या निवृत्तीचं खरं कारण आगरकरनेच सांगितलं; सर्वांसमोर मोठा खुलासा

 

इंग्लंड दौऱ्यात का मिळाली नाही संधी? 

1 . मोहम्मद शमीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मोहम्मद शमीला अनफिट घोषित केले होते. ईएसपीएन क्रिसिन्फोच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयचे वैद्यकीय कर्मचारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी शमीच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी लखनऊला गेले होते. त्यांना शमीला टीम इंडियाच्या ए संघात समाविष्ट करायचे होते. मात्र परदेशातील परिस्थिती लक्षात घेता तो वेगवान गोलंदाज म्हणून टेस्ट सामन्यात जास्तवेळ गोलंदाजी करू शकणार नाही असा करार देण्यात आला. हे एक मुख्य कारण असू शकते. 

2 . इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियात खेळण्याची संधी शमीला न मिळण्यामागे दुसरं कारण दुखापतीमुळे त्याचं जवळपास 2 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर राहणं असू शकतं. तो 2023 वर्ल्ड कपनंतर जवळपास 1 वर्षाहून अधिककाळ टीम इंडियाच्या बाहेर राहिला होता. त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले मात्र त्यात गोलंदाजीत त्याला फारसे यश आले नाही. काही सामन्यात त्याला प्लेइंग 11 मधून सुद्धा बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यावर घोट्याच्या दुखापतीचीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याच्या जुन्या लयमध्ये तो पूर्णपणे दिसला नाही.

3 .तिसरं कारण असं असू शकतं की, टीम इंडियाचं टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्शन कमिटी वर्कलोड मॅनेजमेंटला जास्त गंभीरपणे घेते. खासकरून वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेला. शमीला झालेली दुखापत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ झालेली अनुपस्थिती लक्षात घेता, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक दौर्‍यात त्याचा समावेश करणं योग्य ठरणार नाही असं त्याला वाटलं असेल.  निवडकर्ते अशा गोलंदाजांना प्राधान्य देत आहेत जे सतत आणि बर्‍याच काळासाठी गोलंदाजी करू शकतात. 

भारताचा टेस्ट संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार) (विकेटकिपर ), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू अस्वर्णा, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (विकेटकिपर ), वॉशिंग्टन सुंदर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

Read More