Team India Win Champions Trophy 2025 Bus Parade: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू मायदेशी परतले आहे. परंतु यावेळी हा ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बस परेड होणार की नाही? याकडे चाहत्याचे लक्ष आहे. मायदेशी परतल्यावर प्रत्येक क्रिकेट चाहत्याला टीम इंडियातील खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करायचे आहे. परंतु खेळाडू मायदेशी परतल्यावर वेगवेगळ्या शहरांना रवाना होणार आहेत. यातून कुठेतरी हे देखील स्पष्ट होते की टीम इंडियाची बस परेड आयोजित केली जाणार नाही. गेल्या वर्षी जेव्हा भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला तेव्हा संपूर्ण संघाचे मायदेशी परतल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषात बस परेडही खूप रंगतदार झाली होती. पण आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तरीही बस परेड होणार नसल्याचे संकेत आहे.
बस परेड नसण्याचे एक प्रमुख कारण हे देखील असू शकते की आयपीएल 2025 अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. आयपीएलचा नवीन सीजन यंदा 22 मार्चपासून सुरू होणार आहे, पहिला सामना कोलकाता येथे KKR आणि RCB यांच्यात रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्यात आणि आयपीएल सुरू होण्याच्या तारखेत फार कमी दिवसांचे अंतर आहे. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू आपापल्या आयपीएल संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यापूर्वी काही दिवस विश्रांती घेतील.
हे ही वाचा: आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे घर तुटणार? घटस्फोटाच्या बातमीने आयपीएलपूर्वी उडाली खळबळ
#MumbaiIndians pic.twitter.com/SyxUZqu72X
— Mumbai Indians (@mipaltan) March 10, 2025
हे ही वाचा : Trending Quiz: भारताची ती खास नदी, जिच्या पाण्यात वाहते सोने!
2007 मध्ये भारताने पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर ही ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला तब्बल १७ वर्षे वाट पाहावी लागली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे भारतीय संघाची मोठी बस परेड आयोजित करण्यात आली होती. जिथे त्यांना बघण्यासाठी लाखो चाहते रस्त्यावर आले होते.
हे ही वाचा : आमचा अपमान झाला म्हणणाऱ्या पाकिस्तानला ICC नं फटकारलं! 'चॅम्पियन्स ट्रॉफी देताना तुमचे अधिकारी...'
फायनलबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाने 251 धावा केल्या होत्या, जे भारताने 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने 76 धावांची शानदार खेळी केली. हिटमॅन रोहितला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.