Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!

Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.

IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!

R Ashwin On Anil Kumble Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या राजकोट कसोटीत (Rajkot Test) टीम इंडियाचा (Team India) दिग्गज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. आश्विनने 500 विकेट्स घेत जगातील एतिहासिक कामगिरी करणारा 9 वा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर 500 विकेट्स मोडीस काढणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियाचा महान गोलंदाज अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आता आर आश्विन अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.  

काय म्हणाला आर आश्विन?

या प्रश्नाचं अगदी साधं उत्तर आहे... नाही..! अनिल कुंबळेचा रेकॉर्ड अजून 120 विकेट्स लांब आहे. मला माझा प्रत्येक दिवस आनंदात जगायचा आहे आणि तुम्हाला माहितीये की मी 37 वर्षांचा आहे. यापुढे नक्की काय वाढून ठेवलंय मला माहित नाही. एवढंच काय तर पुढच्या दोन महिन्यात देखील काय होईल? हे देखील माहित नसतं. तू येत्या काळात मालिका खेळणार का? की खेळणार नाही? हे तुम्हाला माहित देखील नसतं, असं आर आश्विनने म्हटलं आहे.

खरं सांगायचं तर गेल्या चार-पाच वर्षांत मी जे शिकलो आहे, ते खूप सोपे आहे. मी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून स्वत:ला वेगळं ठेवलंय आणि अशा प्रकारे खेळणं माझ्यासाठी सोपं राहिलंय. खूप लांबचा प्रवास झाला आहे. कुठून सुरुवात करावी ते कळत नाही कारण मी अपघाताने स्पिनर झालो. मला नेहमीच फलंदाज व्हायचे होते. आयुष्याने मला संधी दिली, असं आर आश्विन म्हणाला आहे.

दरम्यान, आयपीएलमुळे मी बऱ्याच लोकांच्या नजरेस आलो आणि मला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. मी कसोटी गोलंदाज बनू शकेन की नाही याबद्दल लोकांना शंका होती. पण आता 10 ते 12 वर्षांच्या कामगिरीनंतर मी म्हणेन की खूप काही वाईट केलं नाही. मी माझ्या कामगिरीने आनंदी आहे, असं आश्विन म्हणाला आहे.

आर अश्विन अचानक टीमबाहेर

तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन अचानक स्कॉडमधून बाहेर झाल्याची माहिती मिळाली. अश्विन (Ravichandran Ashwin) अचानक तिसऱ्या टेस्टमधून बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनसंदर्भात ( Ravichandran Ashwin ) सोशल मीडियावर पोस्ट केलीये.

Read More