Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

प्लेऑफपूर्वी RCB ने का बदलला कॅप्टन? जितेश शर्माला दिली नेतृत्व करण्याची संधी, कारण आलं समोर

RCB VS SRH :  टेबल टॉपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या सामन्यात आरसीबीने त्यांचा कर्णधार बदलला. रजत पाटीदार ऐवजी जितेश शर्मा याला आरसीबीने या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र असं का घडलं याचं कारण समोर आलं आहे.

प्लेऑफपूर्वी RCB ने का बदलला कॅप्टन? जितेश शर्माला दिली नेतृत्व करण्याची संधी, कारण आलं समोर

RCB VS SRH : आयपीएल 2025 चा 65 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना आरसीबीला टेबल टॉप करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सामना जिंकल्यास पॉईंट्स टेबलमध्ये क्रमांक 2 वर असणारी आरसीबी पहिल्या नंबरवर येऊ शकते. मात्र टेबल टॉपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या सामन्यात आरसीबीने त्यांचा कर्णधार बदलला. रजत पाटीदार ऐवजी जितेश शर्मा याला आरसीबीने या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र असं का घडलं याचं कारण समोर आलं आहे.

आरसीबीने टॉस जिंकला : 

लखनऊच्या एकना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शुक्रवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या अर्धातासपूर्वी दोन्ही संघांमध्ये टॉस खेळवण्यात आला. यावेळी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार ऐवजी जितेश शर्मा कर्णधार म्हणून टॉससाठी आला. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आणि सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलं. मात्र आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार ऐवजी जितेश शर्मा टॉससाठी का आला असा सवाल सर्वांनाच पडला होता ज्याचं उत्तर जितेशने दिलं. 

मे च्या सुरुवातीला आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात कर्णधार रजत पाटीदारच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आराम मिळावा म्हणून तो सनरायजर्स हैदराबाद सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल. या सामन्यात तो  क्षेत्ररक्षण करणार नाही, फक्त फलंदाजी करण्यासाठी मैदानात येईल असे जितेश शर्माने सांगितले. 

जितेश शर्मा काय म्हणाला?  

टॉससाठी आलेला जितेश शर्मा म्हणाला की, 'आरसीबीचे कर्णधार करण्याची ही माझी पहिली वेळ आहे. मी गेल्या वर्षी सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध पंजाब किंग्सचे नेतृत्व केले होते. आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करीत आहोत. आम्ही टेबलच्या प्रथम स्थानी राहून लीग पूर्ण करण्यास आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. व्यवस्थापनाने खेळाडूंची काळजी घेतली आहे. संघाचं वातावरण चांगलं आहे. आम्हाला प्रत्येक गेम जिंकण्याची आणि कप जिंकण्याची इच्छा आहे. रजत पाटीदार हा आजच्या सामन्यासाठी इम्पॅक्ट खेळाडू आहे.'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेईंग 11 :

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रावल, जितेश शर्मा (कर्णधार) , टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी नगीदी, सुयश शर्मा

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11 :

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकिपर), नितीष कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेट वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकत, इशान मालिंगा

Read More