Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विजय माल्याने का खरेदी केली RCB ची टीम? 18 वर्षांनी केला खुलासा, ऐकून फॅन्सनाही आश्चर्य वाटेल

Vijay Mallya On RCB : व्यावसायिक विजय माल्या हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पहिला मालक होता. विजय माल्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याने आरसीबी संघ का खरेदी केली याविषयी खुलासा केला आहे

विजय माल्याने का खरेदी केली RCB ची टीम? 18 वर्षांनी केला खुलासा, ऐकून फॅन्सनाही आश्चर्य वाटेल

Vijay Mallya On RCB : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला हरवून पहिल्यांदा विजेतेपद जिंकलं. 2008 पासून जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली त्यापासून आरसीबी (RCB) संघ आयपीएलचा भाग आहे, मात्र मागील 17 वर्षांमध्ये त्यांना एकदाही विजेतेपद पटकावण्यात यश आलं नव्हतं. मात्र अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने 18 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 

व्यावसायिक विजय माल्या हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पहिला मालक होता. विजय माल्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याने आरसीबी संघ का खरेदी केली याविषयी खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये विजय माल्या म्हणाला की, त्याने तीन फ्रेंचायझीसाठी बोली लावली होती. यात मुंबई इंडियन्सचा सुद्धा समावेश होता. परंतू मुंबई संघावर मुकेश अंबानी यांनी बोली लावली. मुंबई संघाला खरेदी करण्यात अपयश आल्याने विजय माल्याने 2008 मध्ये 112 मिलियन डॉलर मध्ये आरसीबीला खरेदी केला. 

विजय माल्याने पुढे पॉडकास्टमध्ये म्हटले की, 'मी बीसीसीआय समितीसमोर ललित मोदी यांनी या लीगबद्दल केलेल्या सादरीकरणाने मी खूप प्रभावित झालो. त्यांनी एके दिवशी मला फोन केला आणि म्हणाले आयपीएल संघांचा लिलाव होणार आहे. तुम्ही त्यात संघ खरेदी कराल का? म्हणून मी तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली आणि मी मुंबई इंडियन्स संघावर सुद्धा बोली लावली पण ती बोली मी खूप कमी पैशांनी हरलो.

हेही वाचा : रोहित शर्मा कुठे आहे? फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नावर ऋषभ पंतनं दिलं भन्नाट उत्तर

 

आरसीबीचे पूर्वीचे मालक माल्याने म्हटले की, 'जेव्हा मी 2008 मध्ये आरसीबी फ्रेंचायझीसाठी बोली लावली, तेव्हा मी आयपीएलला भारतीय क्रिकेटसाठी गेमचेंजर म्हणून पाहिले. माझं व्हिजन एक असा संघ बनवणे होतं जो बंगळुरूच्या भावना दर्शवेल, यासह तो जीवंत, गतिशील, ग्लैमरस असेल'. 

विजय माल्याने सांगितले की, 'मी आरसीबी संघावर 112 मिलियन डॉलर बोली लावली जी यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त बोली होती. मला याच्या क्षमतेवर विश्वास होता. मला आरसीबी हा असा ब्रँड बनवायचा होता जो केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही उत्कृष्टतेचे प्रतीक असावा. म्हणूनच मी रॉयल चॅलेंजर्स सोबत जोडला गेलो. जेणेकरून त्याला बोल्ड ओळख मिळू शकेल. रॉयल चॅलेंज हा आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मद्य ब्रँडपैकी एक आहे'.

 

Read More