Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Glenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी

Cricket Australia: गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. 

Glenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी

Cricket Australia: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. असा दावा केला जातोय की, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बेशुद्ध झाला होता. दरम्यान आता तपासणीनंतर यासंदर्भातील संपूर्ण कहाणी समोर आली आहे. झालं असं होतं की, गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. 

ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलबाबत बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा, त्याला रूग्णालयात का दाखल करावं लागलं याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालात, तो बेशुद्ध असून रूग्णालयात नेताना तो शुद्धीवर आल्याचं म्हटलं गेलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्सवेल एका कॉन्सर्टमध्ये असताना ही घटना घडली होती. अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असं म्हटलं आहे की, शो दरम्यान, मॅक्सवेलने तिथल्या अनेक लोकांसोबत फोटो काढले होते. त्यानंतर तो आणि त्याचे काही मित्र स्टेजच्या मागे जाऊन दारू पिऊ लागले. त्यानंतर त्याचे मित्र खोलीत आले. यादरम्यान मॅक्सवेल बेशुद्ध झाला आणि त्याला शुद्धीच आणण्याचा प्रयत्न केला असता त्याला शुद्ध आली नाही. मग अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. यावेळी मॅक्सवेलला जितकं आठवतंय त्यानुसार, रूग्णालयात नेत असताना तो शुद्धीत आला होता.

रूग्णालयात नेल्यानंतर पुढे काय घडलं?

मॅक्सवेलला रूग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं. सध्या तो टीमसोबत असल्याची माहिती आहे. दुसर्‍या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलंय की, मॅक्सवेलने तात्काळ मुख्य सिलेक्टर जॉर्ज बेली यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर मॅक्सवेलच्या मॅनेजरने हाय परफॉर्मंस बेन ऑलिव्हर यांना माहिती दिली. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, आता तो बरा आहे. त्याला या सर्व गोष्टींची लाज वाटत असून तो ठीक आहे. 

वनडे सिरीजमधून मॅक्सवेलला विश्रांती

मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया टीमसह ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचलाय. ऑस्ट्रेलियाची टीम सध्या वेस्ट इंडिजविरोधात 2 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळतेय. यामधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकला आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे सिरीज पार पडणार आहे. जास्त वर्कलोड असल्याने या मालिकेतून मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली आहे. 

वेस्ट इंडिजविरोधातील ऑस्ट्रेलिया संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्लेट, नाथन एलिस, कैमरन ग्रीन, एरोन हार्डी, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, जेक फ्रेसर, लांस मोरिस, मॅट शॉर्ट, एडम जम्पा

Read More