KKR Owner Shah Rukh Khan: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या तयारीला सुरुवात झाली असून, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन लवकरच फ्रँचायझी बदलू शकतो अशी चर्चा रंगली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की, शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सॅमसनला आपल्या संघात घेण्याचा विचार करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनने स्वतःहून राजस्थान रॉयल्समधून रिलीज होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच तो अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटदरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांना भेटला होता. यानंतर सॅमसन CSK मध्ये जाऊ शकतो अशीही अटकळ सुरू झाली. मात्र, आकाश चोप्रा म्हणाला, “CSK पेक्षा माझ्या मनात आधी KKRचं नाव येतं. कोलकात्याकडे सध्या एकही स्थिर विकेटकीपर-बॅट्समन नाही. अशा वेळी जर त्यांना फलंदाजीची खोली वाढवायची असेल आणि सोबत कर्णधारही मिळत असेल, तर हा व्यवहार फायदेशीर ठरेल.”
चोप्राने KKR च्या IPL 2025 मधील कर्णधार अजिंक्य रहाणेचंही कौतुक केलं. त्याने सांगितलं की, रहाणेने गेल्या मोसमात फलंदाजीसह नेतृत्वही उत्तम केलं, पण वयाचा विचार करता KKR भविष्यासाठी सॅमसनकडे वळू शकते.
संघाचा पर्स बॅलन्स करण्यासाठी चोप्राने सुचवलं की KKR वेंकटेश अय्यरला रिलीज करून बजेटमध्ये 24 कोटी रुपयांची भर घालू शकते. गेल्या सिजनमध्ये कोलकात्याने अय्यरला तब्बल 23.75 कोटींमध्ये विकत घेतलं होतं आणि तो त्या वेळी IPL 2025 मधील टॉप 5 महागड्या खेळाडूंमध्ये होता.
प्र. 1: संजू सॅमसन कोण आहे?
उ. संजू सॅमसन हा भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर-बॅट्समन असून तो प्रामुख्याने T20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतो. IPL मध्ये तो अनेक वर्षे राजस्थान रॉयल्ससाठी खेळला आहे आणि कर्णधारही राहिला आहे.
प्र. 2: संजू सॅमसनने IPL कारकीर्द कधी सुरू केली?
उ. त्याने २०१३ साली राजस्थान रॉयल्सकडून आपली IPL कारकीर्द सुरू केली.
प्र. 3: संजू सॅमसनचे खास वैशिष्ट्य काय आहे?
उ. त्याचा नैसर्गिक आक्रमक फलंदाजीचा अंदाज, शांत नेतृत्वशैली आणि मोठ्या षटकार मारण्याची क्षमता हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते.