Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विम्बल्डन : सुपरमॉम सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर सेरेना विल्यम्सने जोरदार पुनरागमन केलेय. सेरेनाने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

विम्बल्डन : सुपरमॉम सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

लंडन : आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर सेरेना विल्यम्सने जोरदार पुनरागमन केलेय. सेरेनाने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेरेनाने दहावी अंतिम फेरी गाठण्याची किमया केली आहे. अंतिम फेरीत सेरेनाची गाठ अँजेलिक कर्बरशी पडणार आहे. 

सेरेनाने उपांत्य फेरीत जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जसचा ६-२, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान,  ज्युलियाने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत तिला सेरेनाचे आव्हान मोडता आले नाही.  विजयानंतर सेरेनाने आपला एक हात उंचावत उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केले. 

सेरेना विल्यम्सने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. सेरेनाचे आक्रमण ज्युलियाला परतविणे शक्य झाले नाही. आजच्या सामन्यात सेरेनाच्या एकाही फटक्याचे प्रत्युत्तर ज्युलियापाकडे नव्हते. याचा फायदा घेत सेरेनाने सामन्यात सहज बाजी मारली.

Read More