Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'भारतीय संघ त्याला कायमचा गमावू शकतो....' 'या' स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीला बुमराहची चिंता, टीम इंडियाला दिली वॉर्निंग

Jasprit Bumrah: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होत आहे. याआधी एका स्टार खेळाडूच्या पत्नीने जसप्रीत बुमराहबद्दल मोठे विधान केले आहे.   

'भारतीय संघ त्याला कायमचा गमावू शकतो....'  'या' स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीला बुमराहची चिंता, टीम इंडियाला दिली वॉर्निंग

Alyssa healy on jasprit bumrah workload: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघासाठी एक मोठी चिंतेची बाब समोर आली आहे. या चिंतेला घेऊन एका स्टार खेळाडूच्या पत्नीने जसप्रीत बुमराहबद्दल मोठे विधानहि केले आहे. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडबाबत आता चिंता व्यक्त केली जात असून, याचबद्दल एका आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूने थेट टीम मॅनेजमेंटला इशारा दिला आहे.

कोण आहे ही महिला? 

ही महिला आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिशेल स्टार्कची पत्नी आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हीली ही. तिनेच बुमराहच्या सततच्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बुमराह मागील वर्षभरापासून सातत्याने गोलंदाजी करत आहे. शिवाय तो काही वेळा दुखापतींनीही त्रस्त झालेला आहे.

हे ही वाचा: Video: षटकार मारला काही क्षणातच...मैदानातच झाला क्रिकेटपटूचा मृत्यू, कारण...घटना कॅमेऱ्यात कैद

 

एलिसा हीलीचा संघाला इशारा

एलिसा हीलीने एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, “भारतीय संघ त्याच्या वर्कलोडचं व्यवस्थापन करत आहे असं ते म्हणतात, पण आकडे काय सांगतात पाहिलं आहे का? 2024 पासून बुमराहने टेस्ट सामन्यांमध्ये सर्वात जास्त ओव्हर्स टाकल्या आहेत. त्याची आधीच एक सर्जरी झाली आहे आणि अजूनही त्याला त्रास होतो आहे. एक माणूस म्हणून ही गोष्ट काळजीची वाटते. त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याचा लहानसा परिवार आहे. पुन्हा एकदा जर त्याला दुखापत होऊन सर्जरी करावी लागली, तर भारतीय संघ त्याला कायमचा गमावू शकतो.”

हे ही वाचा: 'मी त्याच्यावर खूप निराश...', शुभमन गिलबाबत रवी शास्त्रींचं थेट विधान, कमेंटने उडाली खळबळ

 

बुमराहचा जबरदस्त फॉर्म, पण किती सामने खेळणार?

बुमराहने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्लेमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत जबरदस्त प्रदर्शन करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्याचा वर्कलोड लक्षात घेता संपूर्ण पाच कसोट्यांऐवजी तो केवळ तीनच सामने खेळणार असल्याचं समोर आलं आहे. नेमकं तो कोणते तीन सामने खेळणार, यावर अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली  नाही. दुसऱ्या कसोटीत तो खेळणार का नाही, हे अंतिम निर्णयावर ठरणार आहे.

हे ही वाचा: RCBच्या 'या' खेळाडूवर महिलेने लावले लैंगिक शोषणाचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध, FIR दाखल

 

गेल्या वर्षभरात बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 410.4 ओव्हर्स टाकल्या आहेत.  जो कोणत्याही वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक आकडा आहे. त्याच्या मागे ऑस्ट्रेलियाचे मिशेल स्टार्क (362.3 ओव्हर्स) आणि पॅट कमिन्स (359.1 ओव्हर्स) आहेत.

Read More