Divya Deshmukh: 2025 च्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक (FIDE Women's World Cup) स्पर्धेत भारताची 19 वर्षीय खेळाडू दिव्या देशमुख हिने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. अंतिम फेरीत विजयी होत दिव्याने विदर्भासह देशाचे नाव जगभरात नेले. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विजयी झालेल्या विदर्भ कन्या दिव्या देशमुखला काय बक्षीस मिळणार? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
दिव्याने सेमीफायनलमध्ये माजी विश्वविजेत्या चीनच्या तान झोंग्यी हिला 1.5-0.5 अशा फरकाने पराभूत केले.यापूर्वी तिने भारताच्या हरिका द्रोणावल्ली आणि चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जिनर यांनाही पराभूत केले होते.अंतिम फेरीत तिचा सामना भारताच्या कोनेरू हंपी किंवा चीनच्या लेई टिंगजी यांच्यापैकी एकाशी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून तिने 2026 मधील महिला कँडिडेट्स टूर्नामेंट साठी पात्रता मिळवली आहे, जिथे ती विश्वविजेतेपदासाठी स्पर्धक ठरू शकते.तिने तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला, जो बुद्धिबळातील सर्वोच्च खिताब मिळवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.
दिव्या देशमुखला पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळाला आहे, जो तिच्या करिअरसाठी महत्त्वाचा आहे. FIDE Women's World Cup 2025 तरी सामान्यतः अशा स्पर्धांमध्ये पुढीलप्रमाणे बक्षिसे दिली जातात. फिडे विश्वचषक स्पर्धांमध्ये विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात रोख बक्षीस दिले जाते. पुरुष विश्वचषक 2023 मध्ये विजेत्याला सुमारे $110,000 आणि उपविजेत्याला $80,000 मिळाले होते. महिलांच्या स्पर्धेत यापेक्षा काही कमी रक्कम असू शकते. परंतु अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या खेळाडूंना लाखोंच्या घरात बक्षीस मिळते.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी मेडल्स, ट्रॉफी आणि जागतिक क्रमवारीत सुधारणा यांसारखे फायदे मिळतात.
Divya Deshmukh wins the 2025 FIDE Women’s World Cup!
— International Chess Federation (@FIDE_chess) July 28, 2025
Divya Deshmukh
Humpy Koneru
Tan Zhongyi
Results - Final:
Divya Deshmukh 2.5-1.5 Humpy Koneru
Tan Zhongyi 1.5-0.5 Lei Tingjie #FIDEWorldCup pic.twitter.com/NDtnO4pPXU
दिव्या देशमुख मुळची नागपूरची आहे. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख हे दोघेही डॉक्टर आहेत.
2025 च्या FIDE महिला विश्वचषक फायनलमधील विजेत्याला 50 हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे 43 लाख रुपये) आणि उपविजेत्याला 35 हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) मिळतील. अशाप्रकारे, दिव्याला सुमारे 43 लाख रुपये मिळणार आहेत. त्याच वेळी, हम्पीच्या खात्यात 30 लाख रुपये येतील.
दिव्या देशमुख भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी आहे.2023 मध्ये ती इंटरनॅशनल मास्टर झाली.2024 मध्ये तिने वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर-20 चॅम्पियनशिप जिंकली (11 पैकी 10 गुण).2024 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिने वैयक्तिक सुवर्णपदक आणि संघ सुवर्णपदक जिंकले.