Female Athletes: वर्ल्ड अॅथलेटिक्स काउंसिलने महिला अॅथलेटिक्स क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड अॅथलेटिक्स कौन्सिलनं महिला अॅथलीट्ससाठी एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त नियम लागू केला आहे. नवीन नियमानुसार, प्रत्येक महिला अॅथलीटला एकदाच का होईना, पण ‘जेंडर टेस्ट’ (SRY Gene Test) करणे अनिवार्य असेल, अन्यथा त्या वर्ल्ड अॅथलेटिक्स रँकिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. 1 सप्टेंबर 2025 पासून जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिला खेळाडूला ‘जेंडर टेस्ट’ करणे बंधनकारक असेल. एकदाच करावी लागणारी ही चाचणी, SRY Gene Test नावाने ओळखली जाते.
13 सप्टेंबर 2025 पासून टोकियोमध्ये होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपपासून हे नियम प्रत्यक्षात लागू होणार आहेत. या अंतर्गत, महिला गटात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी ‘SRY जीन टेस्ट’ करून घेतलेली असली पाहिजे. ही चाचणी दोन प्रकारे केली जाऊ शकते
एकदा ही चाचणी झाली की पुन्हा ती गरजेची नाही. मात्र, कोणी ही चाचणी नाकारली, तर त्या खेळाडूला वर्ल्ड रँकिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही.
हा नवा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, त्याचा थेट परिणाम 13 सप्टेंबरपासून टोकियोत होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपवर होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक महिला स्पर्धकाला SRY जीन टेस्ट देणे बंधनकारक असेल.
The World Athletics Council has approved new regulations concerning eligibility conditions to compete in the female category for world ranking competitions.
— World Athletics (@WorldAthletics) July 30, 2025
The new regulations come into effect on 1 September 2025 and will be applied to the World Athletics Championships Tokyo 25… pic.twitter.com/BO8Lz4kfwS
या चाचणीचा उद्देश म्हणजे महिलांच्या कॅटेगरीत ‘बायोलॉजिकल पुरुष’ सहभागी होऊ नयेत, हे सुनिश्चित करणं असं आहे. अनेक वेळा स्पर्धांमध्ये लिंगाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ल्ड अॅथलेटिक्सनं हा निर्णय घेतला आहे.
वर्ल्ड अॅथलेटिक्सचे अध्यक्ष सेबेस्टियन कोए म्हणाले की, “महिला खेळात जैविक न्याय ठेवणं गरजेचं आहे. जर कोणी महिला खेळाडू म्हणून एलीट स्तरावर स्पर्धेत उतरते, तर तिने जैविकदृष्ट्या महिला असणं अनिवार्य आहे. यामागचा हेतू कोणालाही वगळणं नाही, तर महिला गटातील स्पर्धेची शुद्धता आणि विश्वास टिकवणं हे आमचं उद्दिष्ट आहे."
या विषयावरचा वाद नवीन नाही. पॅरिस ऑलिंपिक 2024 दरम्यान अल्जेरियाची बॉक्सर ईमान खेलेफ चर्चेत होती. तिच्यावर पुरुष असूनही महिला गटात खेळण्याचे आरोप झाले होते. जेंडर टेस्टिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. तरीही, ऑलिंपिक कमिटीने खेलेफचा पाठिंबा घेतला आणि IBA च्या टेस्टिंगवरच प्रश्न उपस्थित केले गेले. अखेरीस खेलेफने त्या गटातील गोल्ड मेडलही जिंकले.