Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचचा फिव्हर, क्रिस गेलचा खास सूट

भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर या दोन देशांतच नाही, तर जगभरात पाहायला मिळत आहे.

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचचा फिव्हर, क्रिस गेलचा खास सूट

मॅन्चेस्टर : भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर या दोन देशांतच नाही, तर जगभरात पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेलदेखील या सामन्याच्या रंगात रंगला आहे. या सामन्यासाठी त्याने एक खास सूट शिवून घेतला आहे. कोटाच्या एका बाजुला भारताचा तिरंगा आणि दुसऱ्या बाजुला पाकिस्तानच्या झेंड्याचं डिझाईन असलेला हा खास कोट त्यानं आज घातला आहे.

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन क्रिस गेलने त्याचा सूट घातलेला फोटो शेअर केला आहे. 'मी माझ्या भारत-पाकिस्तान सूटमध्ये आहे. प्रेम आणि सन्मान. मला हे खरंच आवडतं. २० सप्टेंबरला माझ्या बर्थडे पार्टीमध्येही हा एक ड्रेस असेल,' असं क्रिस गेलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हणलं आहे.

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ मॅच झाल्या आहेत. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान एकमेकांना भिडले होते.

 

Read More