Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे.

World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा लवकरच बाप होणार आहे. पण वर्ल्ड कपदरम्यान वॉर्नर बायकोला भेटायला जाणार नाही. याआधी जेव्हा वॉर्नर वडिल होणार होता तेव्हा प्रत्येकवेळी त्याच्या पत्नीसोबत होता.

वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मुकाबला होणार आहे. या मॅचआधी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होता. यावेळी त्यांनी डेव्हिड वॉर्नरची बायको प्रेगनंट असल्याची माहिती दिली.

'डेव्हिड वॉर्नरच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. तो तिसऱ्या मुलाचा बाप होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ही गोड बातमी येईल, पण डेव्हिड वॉर्नर टीमसोबतच असेल,' असं लँगर म्हणाले. याआधी वॉर्नर पहिल्यांदा बाप झाला तेव्हा त्याने झिम्बाब्वे दौरा सोडला होता. तर दुसऱ्यावेळीही त्याने दोन मॅच खेळल्या नव्हत्या. या दोन्ही वेळी पत्नीला भेटायला गेला होता.

एका वर्षाआधीही डेव्हिड वॉर्नरची पत्नी प्रेगनंट होती. पण बॉल छेडछाडप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नरचं एक वर्षासाठी निलंबन झालं. या मानसिक धक्क्यामध्ये वॉर्नरच्या पत्नीचा गर्भपात झाला होता.

डेव्हिड वॉर्नरने या वर्ल्ड कपच्या ६ मॅचमध्ये ४४७ रन केले आहेत. यामध्ये २ शतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध वॉर्नरने १६६ रनची खेळी केली होती. या वर्ल्ड कपमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे.

Read More