Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे.

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

ओव्हल : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आहे. वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फक्त एकच मॅच खेळली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मॅचमध्ये भारताने विजयी सलामी दिली होती. तर ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम ४ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आणि टीम इंडिया २ पॉईंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

अशी आहे टीम इंडिया

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची टीम

डेव्हिड वॉर्नर. एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, स्टिव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, एलेक्स कारे, नॅथन कुल्टर नाईल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झम्पा

p>

Read More