Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला आहे. 

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उडी

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ३६ रननी विजय झाला आहे. ३५३ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ५० ओव्हरमध्ये ३१६ रनवर ऑल आऊट झाला.

या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सातव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यामुळे खात्यात ४ पॉईंट्स आहेत. तर ३ मॅचमधल्या ३ विजयांमुळे न्यूझीलंडची टीम ६ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ३ मॅचमधल्या २ विजयांमुळे इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा टीम इंडियापेक्षा चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ३ मॅचमधले २ विजय आणि १ पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया ४ पॉईंट्स मिळवून चौथ्या क्रमांकावर आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तानच्या खात्यात प्रत्येकी ३-३ पॉईंट्स असल्यामुळे ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशने १ सामना जिंकल्यामुळे ते सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला एकही मॅच जिंकता आली नाही. या दोन्ही टीम नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.

टीम इंडियाची या वर्ल्ड कपमधली पुढची मॅच गुरुवार १३ जूनरोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यानंतर रविवारी १६ जूनला पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना रंगेल. 

 

Read More