Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

भारत-पाकिस्तान सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख प्रेक्षक एकाचवेळी राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.   

Ind vs Pak: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये 1 लाख लोकांनी एकत्र गायलं राष्ट्रगीत; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

भारत-पाकिस्तान सामन्यातील अनेक क्षण चर्चेचा विषय असतात. शनिवारी झालेल्या सामन्यातही असे अनेक क्षण प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाले. 1 लाख 32 हजार प्रेक्षकक्षमता असणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात हा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या सामन्यात काही प्रेक्षकांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न केला. 

भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी मैदानात एक भव्य संगीत सोहळा पार पडला. यावेळी गायिका सुनिधी चौहान, अरिजीत सिंग आणि शंकर महादेवन यांच्यासह सुखविंदर सिंग यांनी गाणी गात कला सादर केली. यानंतर रोहित शर्मा आणि बाबर आझम टॉससाठी मैदानात आले असता काही हुल्लडबाजांनी बाबर आझमला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

बाबर आझमने टॉस झाल्यानंतर सांगितलं की, "आम्ही पहिले दोन सामने जिंकत चांगली सुरुवात केली आहे. आमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. स्टेडिअमदेखील खचाखच भरलेलं आहे. आम्ही चांगलं प्रदर्शन करु इच्छित आहोत. आम्ही चांगला सराव केला आहे".

भारत-पाकिस्तान सामना असल्याने मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे. दरम्यान सामन्याआधी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत झालं. भारतीय राष्ट्रगीत सुरु झालं असता एक वेगळा आणि अंगावर काटा आणणारा अनुभव अनुभवण्यास मिळाला. मैदानातील 1 लाख प्रेक्षकांनी एकत्रित राष्ट्रगीत गायलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दोन्ही संघांची प्लेइंग-11:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि  मोहम्मद सिराज.

पाकिस्तान संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफरीदी और हारिस रौफ. 

Read More