World Cup Ind Vs Eng : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी क्रिकेट वर्ल्ड कप सलग सहाव्या विजयाची नोंद केली. रविवारी लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्याआधी भारतीय संघाला विश्रांती मिळाल्यामुळे, यजमान आपल्या खेळीमध्ये सातत्य कायम राखू शकतील की नाही याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती.
सामना सुरु झाला, गतविजेत्या इंग्लंडने भारताला 229/9 वर रोखले. स्टार फलंदाजांची रांग असणाऱ्या इंग्लंडच्या संघामुळं भारतीय क्रिकेट संघ दडपणाखाली होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी वेग घेतला आणि इंग्लंडचा डाव अवघ्या 129 धावांत गुंडाळला.
100 धावांनी विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या आणखी जवळ गेला. तिथं संघानं विजयी पताका उंचावताच इथं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीलाही चालना मिळाली. अनेकांनाच आमिर खान स्टारर 'लगान' या चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटाची कथा आणि भारताचं ब्रिटीशांशी असणारं नातं आता इथं नव्यानं सांगण्याची गरज नाही. बस्स, मग काय? याच नात्यावर काही मीम्स तयार करत नेटकऱ्यांनी इंग्लंडच्या संघाची खिल्लीही उडवली. 'तीन गुना लगान..' म्हणत अनेकांनी बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून टीम इंडियाचा विजयोत्सव साजरा केला.
Lagaan Maaf! India BEAT England by huge margin!! Not just beating England,
— Gyaani-Cricketer (@GyaaniCricketer) October 29, 2023
"DEMOLISHED" "ATTACKED"
"THRASHED" "DOMINATED" "DEMORALISED"
ALL 6/6 TEAMS.
INDIA LOOKS INVINCIBLE #WorldCup2023 pic.twitter.com/PAEKEKuhxv
No more doooogna lagaan... Hum jeet gaye!! #INDvsENG pic.twitter.com/ctnziDTPLt
— Mimansa Shekhar (@mimansashekhar) October 29, 2023
TEEN GUNNA LAGAAN LE LIYA
— Vivek Singh (@VivekSi85847001) October 29, 2023
INDIA DEFEATS ENGLAND BY 100 RUNS
Great batting by Rohit, KL & Surya..
Amazing bowling by our World Class Bowlers #INDvsENG #CWC2023 pic.twitter.com/2UOBXzW0fJ
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी आपल्या जादुई गोलंदाजीच्या जोरावर आणि रोहित शर्माच्या 87 धावांच्या बळावर लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग सहावा विजय मिळवला.
रोहितप्रमाणंच सूर्यकुमार यादवनेही (49) डेथ ओव्हर्समध्ये आवश्यक धावा मिळवून भारताला नऊ बाद 229 धावांपर्यंत मजल मारण्यास मोलाचं योगदान दिलं. इंग्लंडच्या संघाविषयी सांगावं तर, आता हा संघ उपांत्य फेरीच्या लढतीतून बाहेर पडला आहे, तर स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ भारताने सेमी फायनलमधलं आपलं स्थान जवळपास पक्क केलं आहे.