Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

500 धावांसह विश्वविक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे 'हे' आहेत अव्वल फलंदाज

Cricket Records: कसोटी क्रिकेटमध्ये जगातील कोणत्याही फलंदाजाला एका डावात 500 धावांचा विक्रम करता आलेला नाही. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 501 धावा करण्याचा विश्वविक्रम झाला आहे.   

500 धावांसह विश्वविक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे 'हे' आहेत अव्वल फलंदाज

Cricket Records: कसोटी क्रिकेटमध्ये जगातील आजवर कोणत्याही फलंदाजाला एका डावात 500 धावांचा विक्रम करता आलेला नाही. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 501 धावा करण्याचा विश्वविक्रम एका खेळाडूच्या नवी आहे. आज आपण अशा टॉप-5 फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम केला आहे.

कोणाच्या नावावर आहे विश्वविक्रम? 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, अनेक फलंदाजांनी 400 हून अधिक धावा केलेल्या आहेत. पण ब्रायन लारा या वेस्ट इंडिजच्या खेळाडूच्या नावावर  नाबाद 501 च्या विश्वविक्रम आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक धावांची इनिंग खेळणे सोप्पे काम नाही, यावरून फलंदाजाची क्षमता आणि प्रतिभा दिसून येते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांवर एक नजर टाकूयात.

1. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याची गणना जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केली जाते. ब्रायन लारा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद इनिंग खेळण्याचा विश्वविक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. ब्रायन लाराने जून 1994 मध्ये बर्मिंगहॅमच्या मैदानावर डरहॅमविरुद्ध नाबाद 501 धावांची विश्वविक्रमी खेळी खेळली होती. वॉरविकशायरकडून खेळताना ब्रायन लाराने या सामन्यात 62 चौकार आणि 10 षटकार मारले.

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, 'या' दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का

 

2. हनीफ मोहम्मद (पाकिस्तान)

या यादीमध्ये दुसरा नंबर लागतोय पाकिस्तानच्या खेळाडूचा. पाकिस्तानचा फलंदाज हनिफ मोहम्मद याने जानेवारी १९५९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बहावलपूर संघाविरुद्ध ४९९ धावांची खेळी केली होती. हनीफ मोहम्मदचा 500 धावांचा विक्रम अवघ्या 1 धावांच्या फरकाने हुकला होता. कराचीकडून खेळताना हनिफ मोहम्मदने या सामन्यात 64 चौकार मारले होते.

हे ही वाचा: "लग्नाआधी तो..." आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

 

3. डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज डॉन ब्रॅडमन याचा या यादीमध्ये तिसरा नंबर लागतो. डॉन ब्रॅडमनने जानेवारी 1930 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये क्वीन्सलँड संघाविरुद्ध 452 धावांची नाबाद खेळी खेळली होती. डॉन ब्रॅडमनने न्यू साउथ वेल्सकडून खेळताना या सामन्यात 49 चौकार मारले होते. डॉन ब्रॅडमन यांनी सिडनी क्रिकेट मैदानावर ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

4. भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर (भारत)

यादीच्या चौथ्या स्थानी भारताचा महान फलंदाज भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर आहे. त्यांनी डिसेंबर 1948 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये काठियावाड संघाविरुद्ध 443 धावांची नाबाद खेळी खेळली होती. महाराष्ट्राकडून खेळताना भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकरने या सामन्यात 49 चौकार आणि 1 षटकार लगावले होते. भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर यांनी पुण्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. भाऊसाहेब बाबासाहेब निंबाळकर यांनी आपल्या डावात 494 मिनिटे फलंदाजी केली.

हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

 

5. बिल पॉन्सफोर्ड (ऑस्ट्रेलिया)

या यादीत पाचव्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज बिल पॉन्सफोर्डने डिसेंबर 1927 मध्ये क्वीन्सलँड संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 437 धावांची इनिंग खेळली होती.या सामन्यात बिल पॉन्सफोर्डने व्हिक्टोरियाकडून खेळताना 42 चौकार मारले. मेलबर्न क्रिकेट मैदानावर बिल पॉन्सफोर्डने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

Read More