Mumbai Indians : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनसाठी शनिवारी मुंबईत मिनी लिलाव (WPL 2024 Auction) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली, तर अनेक खेळाडूंची निराशा झाल्याचं देखील समोर आलंय. या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने सर्वांना चकित करत काही निर्णय घेतले अन् पलटणच्या ताफ्यात तगड्या खेळाडूंना सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलला (Shabnim Ismail) 1 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलंय, तर डिफेन्डिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (MI) टॅक्सी चालकाची मुलगी कीर्तना बालकृष्णन (Keerthana Balakrishnan) हिला 10 लाख रुपयांना विकत घेतलं आहे.
Keerthana Balakrishnan आहे तरी कोण?
कीर्तना बालकृष्णन ही अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. कीर्थना बालकृष्णन हिचे वडील टॅक्सी चालक आहेत, परंतु त्यांनी आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गात कधीही अडथळा येऊ दिला नाही. कीर्थनाच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने लेकीला तिच्या स्वप्नासाठी खेळण्यासाठी पाठवलं अन् मुलीनेही वडिलांच्या कष्ट सार्थकी लागलं. कीर्तना बालकृष्णन तामिळनाडू महिला संघ तसेच इंडिया वुमेन्स ग्रीन, साउथ झोन वुमन आणि ऑरेंज ड्रॅगन या संघांसाठी खेळली असली तरी कीर्तना बालकृष्णन ही महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) खेळताना प्रथमच दिसणार आहे.
कीर्तनने त्याच्या अकादमीमध्ये अनुभवी फलंदाज अभिनव मुकुंदचे वडील टीएस मुकुंद यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे. लेगस्पिनर असलेल्या कीर्तनाही खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता पलटणच्या ताफ्यात धाकड ऑलराऊंडर एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय.
There are many heroes in the cricketing world , not all wear capes tho
— DK (@DineshKarthik) December 10, 2023
Here is one that not many have heard of
T.S.MUKUND
Father of Indian cricketer ABHINAV MUKUND
He doesn't charge a penny from a lot of cricketers from the lower strata of society and gives them coaching,… pic.twitter.com/IGUoSM5GkG
WPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ:
हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, शबनम इस्माईल, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, एस सजना, नताली स्कायव्हर, फातिमा जाफर, इशाक, यास्तिक, अमनदीप कौर, पूजा वस्त्रकार, कीर्तन बालकृष्णन, प्रियांका बाला.