Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WPL फायनलमध्ये अंपायरचा उडाला गोंधळ! स्वतःच दिलेला OUT चा निर्णय विसरली, Video Viral

WPL 2025 :  मुंबई इंडियन्स सलग दुसऱ्यांदा WPL चा चॅम्पियन्स संघ ठरला. यापूर्वी WPL च्या पहिल्या सीजनची चॅम्पियनशिप मुंबई इंडियन्सने जिंकली होती. या अतितटीच्या सामन्यात अंपायरकडून निर्णय देताना एक चूक झाली सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

WPL फायनलमध्ये अंपायरचा उडाला गोंधळ! स्वतःच दिलेला OUT चा निर्णय विसरली, Video Viral

WPL 2025 : मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians VS Delhi Capitals) यांच्यात महिला प्रीमियर लीग 2025 च्या (WPL 2025) फायनलचा सामना पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सलग तीन सीजन फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा एकदा पराभव करून विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. यासह मुंबई इंडियन्स सलग दुसऱ्यांदा WPL चा चॅम्पियन्स संघ ठरला. यापूर्वी WPL च्या पहिल्या सीजनची चॅम्पियनशिप मुंबई इंडियन्सने जिंकली होती. या अतितटीच्या सामन्यात अंपायरकडून निर्णय देताना एक चूक झाली सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

नेमकं काय घडलं? 

 फायनल सामन्यात ज्याप्रकारे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दबाव असतो, तसाच अचूक आणि निपक्षपाती निर्णय देण्याचा दबाव हा अंपायरवर सुद्धा असतो. त्याचाच प्रत्यय महिला प्रीमियर लीगच्या फायनल सामन्यात आला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडल्याने मुंबईला आधी फलंदाजी करण्याचं आव्हान मिळालं. 16 व्या ओव्हरला मुंबईची फलंदाज अमेलिया केरची विकेट पडल्यावर संजीवन संजना ही फलंदाजीसाठी मैदानात आली. तेव्हा संजना हिने जेस जोनासेन हिच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ती lbw बाद झाली. दिल्लीने lbw बादची अपील केल्यावर मैदानातील महिला अंपायर अंकिता गुहाने फलंदाज आउट असल्याचा निर्णय दिला. मात्र त्याचवेळी नॉन स्ट्राइकला असलेल्या हरमनप्रीत कौरने रिव्हू घेतला. 

हेही वाचा : 'मी एका सामन्यासाठी परत येईन पण...' विराटने टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीतून माघार घेण्यासाठी ठेवली अट

 

रिव्हूवर थर्ड अंपायरने अंपायर कॉलचा निर्णय देत मैदानातील अंपायरने दिलेला निर्णय कायम ठेवला. पण दरम्यान मैदानातील अंपायर अंकिता गुहा थोड्या गोंधळल्या आणि त्यांनी आधी नॉट आउट असा निर्णय दिला, तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की आपण आधी फलंदाजाला आउट निर्णय दिलाय. त्यावेळी पुन्हा बोट वर करून त्यांनी फलंदाजाला आउट असल्याचा निर्णय दिला. यावेळी अंपायर अंकिता यांनी दिलेल्या रिऍक्शनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.  मूळात थर्ड अंपायरनं नॉट आउटचा निर्णय कायम ठेवावा अशी चूक केली त्याची पुनरावृत्ती मैदानातील पंचाकडूनही झाली. 

पाहा व्हिडीओ : 

मुंबई इंडियन्सने मारली बाजी : 

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. मुंबईने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट्स गमावत 149 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 150 धावांचे आव्हान मिळाले होते. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यात दिल्ली अयशस्वी ठरली आणि 9 विकेट्स गमावून केवळ 141 धावा करू शकली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा 8 धावांनी विजय झाला.

Read More