Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात WFI ने मोठी कारवाई केली, 11 कुस्तीपटूंना केले निलंबित

Fake Birth Certificate: भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) ने तब्ब्ल 11 कुस्तीपटूंवर बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणाबद्दल मोठी कारवाई केली आहे.     

बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात WFI ने मोठी कारवाई केली, 11 कुस्तीपटूंना केले निलंबित

Wrestling Federation of India: भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) 7 ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करत 11 कुस्तीपटूंना निलंबित केले आहे. या खेळाडूंवर बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असून, भारतीय कुस्ती महासंघाने 100 हून अधिक प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नक्की काय झालं? 

गेल्या काही काळापासून भारतीय कुस्तीत काही खेळाडूंच्या वयाबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने (MCD) 110 जन्म प्रमाणपत्रांची पडताळणी केली. एमसीडीने सांगितले की, त्यांच्या बाजूने कोणतीही चूक झाली नाही, कारण 95 उशिरा झालेले नोंदणी प्रकरणे एमसीडीच्या आदेशानुसार केली गेली होती. मात्र तपासात असेही उघड झाले की काही खेळाडू स्वतःचे वय कमी दाखवण्यासाठी किंवा इतर राज्यातून खेळण्यासाठी बनावट राहण्याचे प्रमाणपत्रही मिळवत होते.

11 कुस्तीपटूंची प्रमाणपत्रे ठरली फर्जी

भारतीय कुस्ती महासंघाने जन्म प्रमाणपत्रांमध्ये गडबड असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेकडून सत्यापन करून घेतले. तपासात 110 पैकी 11 खेळाडूंची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. भारतीय कुस्ती महासंघाच्या माहितीनुसार, हे खेळाडू मूळचे हरियाणाचे असूनही, त्यांनी एमसीडीमार्फत बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवले, ज्यामुळे ते दिल्लीतील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकले. एमसीडीने स्पष्ट केले की ही 11 प्रमाणपत्रे फोटोशॉपद्वारे छेडछाड करून तयार करण्यात आली होती आणि त्यावर एमसीडीची अधिकृत जारी तारीख नव्हती.

कोण आहेत हे खेळाडू?

एमसीडीने फर्जी प्रमाणपत्रांच्या प्रकरणातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. पीटीआयच्या माहितीनुसार, यात सक्षम, मनुज, कविता, अंशू, आरुष राणा, शुभम, गौतम, जगरूप धनकड, नकुल, दुष्यंत आणि सिद्धार्थ बालियान यांचा समावेश आहे. काही प्रकरणांत तर खेळाडूंचे जन्म प्रमाणपत्र प्रत्यक्ष जन्मानंतर 12 ते 15 वर्षांनी जारी करण्यात आले होते.

 

Read More