Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिलेला वादग्रस्त निर्णय भोवला, कुस्ती पंचांवर निलंबनाची कारवाई

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांच्यावर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलीये. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिलेला वादग्रस्त निर्णय भोवला, कुस्ती पंचांवर निलंबनाची कारवाई

Maharashtra Kesari 2025 : काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत घेतलेला वादग्रस्त निर्णय कुस्ती पंच नितीश काबलिये (Nitish Kabaliye) यांना भोवला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या (Maharashtra State Wrestling Association) वतीने त्यांच्यावर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलीये. 

2 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यसह देशभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही यंदा अहिल्यानगर येथे खेळवली जातं होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेतचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाराष्ट्र केसरी या खिताबासाठी स्पर्धेची अंतिम लढत पार पडली मात्र त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षेच्या पराभवानंतर स्पर्धेत गोंधळ निर्माण झाला. 

हेही वाचा : IPL 2025 सुरु असताना अर्जुन तेंडुलकरने चाहत्यांना केलं भावनिक आवाहन, सोशल मीडियावर केली पोस्ट

 

अहिल्यानगर येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. मात्र यावेळी कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला. रागाच्या भरात शिवराज राक्षे ही आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. यामुले शिवराज राक्षे याला 3 वर्षांसाठी निलंबित सुद्धा करण्यात आलं आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन काबलिये काम करत होते. 

कुस्ती दरम्यान त्यांनी दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला नितीश काबलिये यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे कुस्ती पंच नितीश काबलिये यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नितीश काबलिये यांना पत्र पाठवले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे. 

Read More