WTC Final 2025 : दक्षिण आफ्रिकेने शनिवार 14 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 5 विकेटने पराभूत करून विजय मिळवला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात मागील 27 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 1998 नंतर दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, बऱ्याचदा त्यांचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये सेमी फायनल, फायनलमध्ये पराभूत झाला होता. ज्यामुळे त्यांना चोकर्स हा टॅग मिळाला होता. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून त्यांनी अखेर हा टॅग पुसला. या विजयानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) ऑस्ट्रेलिया संघाच्या स्लेजिंगवर भाष्य केलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचं आव्हान असताना कर्णधार टेम्बा बावुमाने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं. टेम्बाने 66 धावा केल्या यादरम्यान 5 चौकार ठोकले. टेम्बा बावुमाने केलेली ही संयमी खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरली. तसेच स्टार फलंदाज एडन मार्करमने सुद्धा शतकीय खेळी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. तिसऱ्या दिवशी टेम्बा बावुमा आणि मार्करमची पार्टनरशिप दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरली. ज्यामुळे त्यांना चौथ्या दिवशी जवळपास 8 विकेट शिल्लक असताना विजयासाठी 69 धावांची आवश्यकता होती. मात्र त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्लेजिंग करून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं मनोबल खच्चीकरण करायला सुरुवात केली. ज्याबाबत बावुमाने विजयानंतर खुलासा केला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितले की, 'चौथ्या दिवशी आम्हाला विजयासाठी 69 धावांची आवश्यकता होती, आणि हातात 8 विकेट सुद्धा होते. मात्र त्यावेळी सुद्धा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आम्हाला स्लेजिंग करून चोकर्स म्हणून हिणवत होते. विजयासाठी 60 धावा हव्या असताना सुद्धा ते म्हणत होते की ते आम्हाला अजूनही ऑलआउट करू शकतात. ते प्रत्येक ओव्हरनंतर 'लॉक इन' शब्दाचा वापर करत होते. ते म्हणत होते चला यांना 'लॉक इन' करूयात'.
हेही वाचा : सागरिका घाटगे आणि झहीर खाननं पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक; फादर्स डे निमित्त शेअर केली खास पोस्ट
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकिपर), विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगि