Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'टेम्बा बावुमा' चा नेमका अर्थ काय; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला हे नाव कोणी दिलं?

WTC Final 2025 : मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेने हे यश त्यांचा कर्णधार टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात मिळवले. एका मुलाखतीत टेम्बा बावुमा याने त्याच्या नावाचा अर्थ नेमका काय आणि त्याला हे नाव कोणी दिलं याबाबत सांगितलं. 

'टेम्बा बावुमा' चा नेमका अर्थ काय; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला हे नाव कोणी दिलं?

WTC Final 2025 : इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa VS Australia) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवून पहिल्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने त्यांचा 27 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ सुद्धा संपवला आहे. मागील 27 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नव्हतं, मात्र अखेर आज त्यांना हे यश मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेने हे यश त्यांचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नेतृत्वात मिळवले. एका मुलाखतीत टेम्बा बावुमा याने त्याच्या नावाचा अर्थ नेमका काय आणि त्याला हे नाव कोणी दिलं याबाबत सांगितलं. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने साऊथ आफ्रिकेच्या टेस्ट संघाचा कर्णधार झाल्यापासून त्याच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत एकदाही टेस्ट सामना हरलेला नाही. कर्णधार टेम्बा बावुमाची उंची 5.4 फूट आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्याला लहान उंचीवरून ट्रोल केलं जातं. तसेच बऱ्याचदा त्याच्या टेम्बा बावुमानेया नावावरून देखील त्याची खिल्ली उडवली जाते. एका मुलाखतीत टेम्बा बावुमाने त्याच्या नावाबाबत खुलासा केला. त्याने सांगितले की 'टेम्बा' हे नाव त्याला त्याच्या आजीने दिलं होतं. टेम्बा या नावाचा एक अर्थ 'आशा' असा आहे. 

टेम्बा बावुमाने मुलाखतीत पुढे बोलताना म्हटले की, 'माझ्या आजीने माझं नाव टेम्बा ठेवलं ज्याचा अर्थ 'आशा' असा होतो. आपल्या समाजाची आशा, आपल्या देशाची आशा आणि जर तुम्हाला जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळवायच्या असतील तर तुमच्याकडेही हीच आशा असली पाहिजे'.  

टेम्बा बावुमाचं दमदार अर्धशतक : 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचं आव्हान असताना कर्णधार टेम्बा बावुमाने दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं. टेम्बाने 66 धावा केल्या यादरम्यान 5 चौकार ठोकले. टेम्बा बावुमाने केलेली ही संयमी खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी महत्वाची ठरली. 

दक्षिण आफ्रिका प्लेईंग 11 :

एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन (विकेटकिपर), विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

ऑस्ट्रेलिया प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड

 

Read More