Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WTC - भारताचा डाव 170 धावांवर आटोपला, न्यूझीलंडला विजयासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत रंगतदार अवस्थेत

WTC - भारताचा डाव 170 धावांवर आटोपला, न्यूझीलंडला विजयासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान

साऊथेम्पटन : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आहे. भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर ऋषभ पंत वगळता एकाही फलंजादाला टीकाव धरता आला नाही. भारताकडून ऋषभ पंतने 88 चेंडूत 41 धावांची झुंजार खेळी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकण्यासाठी न्यूझीलंडला आता 53 षटकात 139 धावांची आवश्यकता आहे.

पाचव्या दिवसअखेर 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच कायले जेमिनसनने दणका दिला.  विराट कोहली (13), चेतेश्वर पुजारा (15) यांच्या विकेट घेत जेमिनसनने मधली फळी गारद केली. त्यानंतर अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजाही स्वस्तात माघारी परतले. ऋषभ पंतने एकाकी झुंज देत टीम इंडियाचा डाव सांभाळला. 

त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेवटच्या फलंदाजांना जास्त वेळ टीकू दिलं नाही. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने 48 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. बोल्टने 3, जेमीसनने 2 तर नील वॅगनरने 1 बळी घेतला.

Read More