Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी

ही घटना घडली WWE स्टार कलिस्टो याच्यासोबत. कलिस्टोचे खरे नाव, इमॅन्यूअल रॉड्रिग्ज असे आहे.

WWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी

नवी दिल्ली : WWE साठी राग, मारामारी, रक्त, हे नवे नाही. प्रामुख्याने हे सर्व चालते ते रेसलर्समध्ये. चाहत्यांनी फक्त याचा आनंद घ्यायचा असतो. पण, WWEच्या आखाड्यात एक भलतीच घटना पहायला मिळाली. संतापलेल्या एका चाहत्याने थेट रेसलर्सलाच बाटली फेकून मारली. चाहत्याच्या या हल्ल्यात रेससर्स चांगलाच जखमी झाला. 

ही घटना घडली WWE स्टार कलिस्टो याच्यासोबत. कलिस्टोचे खरे नाव, इमॅन्यूअल रॉड्रिग्ज असे आहे. कलिस्टोला एका संतापलेल्या चाहत्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. या हल्यामुळे माजी क्रूजरवेट चॅम्पीयनचे रॉयल रंबलमध्ये खेळणे अनिश्चितचेचे होऊन बसले आहे. झाले असे की, 31 वर्षांचा कलिस्टो आपला सहकारी मेट ग्रान मेटेलिक सोबत ब्रायन कॅड्रिक आणि जॅक याच्या विरोधात रिंगमध्ये खेळत होते. सामना सुरू असताना कलिस्टो रिंगबाहेर पडला होता. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीतील एका चाहत्याने त्याच्यावर बाटली फेकून मारली.

चाहत्याच्या या वर्तनाबद्धल कलिस्टो आणि त्याच्या पत्नीनेही राग व्यक्त केला आहे. त्याने आपली नाराजी आपल्या ट्विटर हॅडलच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. हा हल्ला लज्जास्पद असल्याचेही तो ट्विटमध्ये म्हणतो. आपला जखमी आवस्थेतील फोटो शेअर करत कलिस्टोची पत्नी एबी म्हणते, मी सांगू इच्छिते की असला प्रकार योग्य नाही. तुम्ही जर माझ्या पतीच्या ठिकाणी असता तर, या प्रकाराची दाहकता तुम्हाला समजली असती. या घाणेरड्या प्रकारामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशीही टाके मारणे, औषधे घेणे आणि एमआरआय करणे या कामात गुंतलो आहोत. 

Read More