Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WWE: स्ट्रोमॅन अडकला ज्योतिषाच्या जाळ्यात; चाहत्यांनी घेतली फिरकी

स्ट्रोमॅन नुकताच भारतात आला होता. त्याने अभिनेता वरून धवनसोबत जीममध्ये जाऊन व्यायामही केला होता. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.

WWE: स्ट्रोमॅन अडकला ज्योतिषाच्या जाळ्यात; चाहत्यांनी घेतली फिरकी

नवी दिल्ली: भविष्याची चिंता केवळ दुबळ्या व्यक्तिलाच असते अने नाही. तर, ती कसलेल्या आणि तितक्याच ताकदवान पैलवानालाही असते. डब्ल्युडब्ल्युस्टार स्ट्रॉमॅन हे एक मोठे नाव. डब्ल्युडब्ल्युईमध्ये स्ट्रोमॅन हा आज घडीचा सर्वात ताकदवान रेसलर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. नुकताच तो भारतात आला होता. पण, विशेष असे की, तो ज्योतिष्याकडून आपले भविष्य जाणून घ्यायलाही उत्सुक आहे. नुकताच त्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो एका ज्योतिषाला हात दाखवून त्याच्याकडून सल्ला घेताना दिसत आहे.

स्ट्रोमॅनचा फोटो पाहून शोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यात त्याच्या चाहत्यांनी तर त्याची चांगलीच फिरकी घेतली. स्ट्रोमॅनचा हा फोटो डब्लयूडब्ल्यूईने आपल्या ऑफिशिअली ट्विटर पेजवरही शेअर केला आहे. त्याखाली लिहिले आहे 'भारतीय ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेताना स्ट्रोमॅन. तुम्ही सांगू शकता स्ट्रोमॅनने काय पाहिले असेल?' 

दरम्यान, स्ट्रोमॅन नुकताच भारतात आला होता. त्याने अभिनेता वरून धवनसोबत जीममध्ये जाऊन व्यायामही केला होता. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.

Read More