Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

 २००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.

WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

नवी दिल्ली : WWE स्टार जॉन सीनाने एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे हे वक्तव्य ऐकून त्याच्या चाहत्यांनाही काहीसा धक्का बसला आहे. आपल्या पहिल्या पत्नीपासून आपण का घटस्फोट घेतला याबाबत जॉन सीनाने खुलासा केला आहे. २००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला. सीना म्हणतो की, खरे तर मला पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. पण, लग्नानंतर मला ध्यानात यायला लागले की, मी WWEपासून दूर होत चाललो आहे. 

आयुष्यात WWE हे प्रचंड महत्त्वाचे

सीनाने पुढे सांगितले की, आपल्या आयुष्यात WWE हे प्रचंड महत्त्वाचे आहे. भले माझे वय कितीही वाढले माझ्यावर कितीही बंधने आली तरीही मी माझे आयुष्य WWEलाच अर्पण करीन आणि त्याचा एक घटक असेन, असे सांगतानाच माझ्यावर फॅमेली बनविण्यासाठी प्रेशर होते असेही तो म्हणतो. दरम्यान, एलिजाबेथ मला ओळखत होती. तसेच, आपण जेव्हा एकमेकांसोबत अनेक काळ राहतो तेव्हा आपल्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला नकळतच ध्यानात येत असतात. साधारण सर्वच पती-पत्नीमध्ये ही अत्यंत साधी गोष्ट आहे. या सर्व घडामोडींत माझी फरफट होत होती. परिणामी मी एलीजाबेथसोबत घटस्फोट घेतला असेही जॉन सांगतो.

निकीसोबत ऋणानुबंध

सीनाने पुढे सांगितले की, WWEच्या डिवा निकी बेलासोबत मी इतक्याचसाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला की, तीसुद्धा WWEसोबत जोडली गेली आहे. मला वाटते की, पती-पत्नी जर एकाच क्षेत्रातील असतील तर, ते आपल्या क्षेत्रातील समस्या, अडी अडचणी चांगले समजून घेतात. ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य सुंदर बनते. तसेच, निकी माझ्यात चांगले ऋणानुबंध निर्माण होत चालले होते. त्यामुळे मी थेट लग्न करण्याचाच निर्णय घेतला.

Read More