Yash Dayal sexual harassment case: भारतीय वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या क्रिकेटच्या मैदानाऐवजी एका वादामुळे चर्चेत आहेत. गाझियाबादमधील इंदिरापुरम भागातील एका तरुणीने त्यांच्या विरोधात यौन शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर यशविरुद्ध FIR दाखल झाली होती. मात्र आता यशनेही आपली बाजू मांडत, प्रयागराजच्या पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
यश दयालने आपल्या तक्रारीत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, "ही मुलगी 2021 साली इंस्टाग्रामवर भेटली होती. तेव्हापासून आमचं बोलणं सुरू झालं. हळूहळू तिच्याकडून माझ्यावर तिचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उपचारासाठी लाखो रुपये मागितले. मी ती मदत केली, पण आजतागायत एक रुपयाही परत केला नाही." यशच्या म्हणण्यानुसार, केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर त्याचा iPhone आणि लॅपटॉप देखील तिने चोरून नेले, असा दावा त्याने आपल्या तीन पानी तक्रारीत केलाय. तसेच त्याने खुल्दाबाद पोलीस स्टेशन, प्रयागराज येथे तिला गुन्हेगारी स्वरूपात नोंदवून FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा: RCBच्या 'या' खेळाडूवर महिलेने लावले लैंगिक शोषणाचे आरोप, लग्नाचं आमिष दाखवून पाच वर्षं संबंध, FIR दाखल
7 जुलै रोजी इंदिरापुरम पोलीस ठाण्यात या मुलीने यश दयालविरोधात FIR दाखल केली. तिचा आरोप आहे की, “यशने मला लग्नाचं आमिष दाखवून यौन संबंध ठेवले. मी त्याच्या कुटुंबीयांना देखील ओळखते आणि अनेकदा भेटले आहे.” या आरोपानंतर यशवर मोठं सामाजिक आणि व्यावसायिक दडपण आलं होतं. मात्र आता यशने पुढे येत तिला फसवणूक, चोरी आणि खोट्या आरोपांचं गुन्हेगारी स्वरूपात उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी, आणखी एका दिग्गजाचे अवघ्या 41 वर्षी निधन...
एकीकडे तरुणीचा यौन शोषणाचा दावा आणि दुसरीकडे यशचा आर्थिक व तांत्रिक चोरीचा आरोप यामुळे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं आणि गंभीर बनत चाललं आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंची चौकशी सुरू असून, पुढील काळात काय नवं समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.