Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अर्जुननंतर आता यशस्वी जयस्वालचा मोठा निर्णय, मुंबई टीमकडे फिरवणार पाठ, 'या' संघाकडून खेळणार

Yashavi Jaiswal : बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले तेव्हा जयस्वाल मागील सीजन मुंबईकडून खेळला.  त्याने जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले. 

अर्जुननंतर आता यशस्वी जयस्वालचा मोठा निर्णय, मुंबई टीमकडे फिरवणार पाठ, 'या' संघाकडून खेळणार

Yashavi Jaiswal : भारताचा स्टार क्रिकेटर यशस्वी जयस्वाल (Yashavi Jaiswal) देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघाकडून क्रिकेट खेळतोय. मात्र आता तो मुंबई सोडून गोवा संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. स्टार सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मंगळवारी मेल केला आहे. यात त्याने सांगितले की तो पुढील सीजनमध्ये गोवा संघाकडून खेळू इच्छितो. 

इंडियन एक्सप्रेसने लिहिलेल्या रिपोर्टनुसार, 'एमसीएच्या एका सूत्राने याला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की हो त्यांनी आमच्याकडून एनओसी मागितली आहे. त्यांनी यात तो वैयक्तिक कारणांमुळे गोवा संघाकडून खेळू इच्छितो असं सांगितलं आहे'. 23 वर्षांच्या यशस्वी जयस्वालसाठी हे एक मोठं पाऊल असेल. खासकरून तेव्हा जेव्हा गोवा संघाने नॉक-आउट राउंडसाठी क्वालिफाय केलंय. यापूर्वी अर्जुन तेंडुलकरने देखील देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई संघाची साथ सोडून गोवा संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी जयस्वाल सोबत गोवा संघात अर्जुन तेंडुलकर, सिद्धेश लाड इत्यादी खेळाडूंचा सहभाग आहे. 

जेव्हा बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले तेव्हा जयस्वाल मागील सीजन मुंबईकडून खेळला.  त्याने जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले, तेथील दोन इनिंगमध्ये त्याने 4 आणि 26 धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यशस्वी जयस्वाल याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी विदर्भ सोबत सेमी फायनल सामन्यापूर्वी त्याला पुन्हा मुंबईच्या रणजी संघात सामील करण्यात आले. मात्र दुखापतीच कारण देऊन यशस्वी सामन्यातून बाहेर पडला. 

हेही वाचा : IPL 2025 दरम्यान सारा तेंडुलकर बनली मुंबई संघाची मालकीण, सचिनच्या लेकीचं क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल

 

यशस्वी जयस्वाल त्याच्या अंडर-19 दिवसांपासून मुंबईसाठी खेळतोय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी द्विशतक झळकावल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग दोन वर्षे दमदार कामगिरी केल्यानंतरच त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. यशस्वी जयस्वालने 2024-25 बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये देखील उत्तम कामगिरी केली. तेथे त्याने 5 टेस्ट सामन्यांमध्ये 43.44 च्या सरासरीने त्याने 391 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता.

Read More