Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'5 दिवस तरी टिकशील का?', योगराज सिंग यांनी वैभव सूर्यवंशीला दिलं आव्हान; म्हणाले 'तिथे तुम्ही दमता... AC मध्ये बसून..'

Yograj Singh Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये भारतीय क्रिकेटला अनेक तरुण खेळाडू मिळाले आहेत, ज्यांच्याकडे भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. यामध्ये सर्वाधिक लक्ष 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने वेधून घेतलं. पण माजी क्रिकेटर योगराज सिंग यांना वैभव सूर्यवंशी फार काही रुचलेला दिसत नाही.   

'5 दिवस तरी टिकशील का?', योगराज सिंग यांनी वैभव सूर्यवंशीला दिलं आव्हान; म्हणाले 'तिथे तुम्ही दमता... AC मध्ये बसून..'

Yograj Singh Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये अनेक भारतीय तरुण खेळाडूंनी क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये सर्वाधिक लक्ष 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची चर्चा सर्वाधिक रंगली आहे. वैभव सूर्यवंशीने राजस्थाकडून खेळताना 252 धावा केल्या. यमध्ये त्याने गुजरातविरोधात 35 चेंडूत शतक ठोकत केलेल्या स्फोटक खेळीचाही समावेश आहे. इतक्या तरुण वयात असणारं कौशल्य पाहून अनेकांनी त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली आहे. मात्र युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटर योगराज सिंग यांना वैभव सूर्यवंशी फार काही रुचलेला दिसत नाही. त्यांनी तरुणांना भविष्यासाठी सल्लाच देऊन टाकला आहे. 

सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला, त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध केवळ 14 वर्षं आणि 23 दिवसांचा असतानाच पदार्पण केलं. अवघ्या नऊ दिवसांनी, त्याने जयपूरमध्ये जबरदस्त शतक झळकावलं. आयपीएलच्या इतिहासातील भारतीय फलंदाजाने ठोकलेलं हे सर्वात जलद शतक ठरलं. त्याचा जबरदस्त फॉर्म आयपीएलच्या पलीकडेही कायम राहिला. बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या सराव सामन्यात, त्याने फक्त 90 चेंडूत 190 धावा फटकावल्या आणि भारताच्या अंडर-19 संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आपलं स्थान मजबूत केलं आहे. 

वैभवने इतकी चांगली खेळी केली असली तरी, योगराज सिंग यांनी मात्र त्याला आरसा दाखवला आहे. InsideSport शी संवाद साधताना त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी फक्त टी-20 वर लक्ष्य केंद्रीत करणाऱ्या तरुणांना भविष्यासाठी सल्ला दिला आहे. 

"कसोटी क्रिकेट हेच माझं व्हिजन आहे. तुम्ही पाच दिवस टिकू शकता का? हीच खरी परीक्षा आहे. 50 आणि 20 ओव्हर्स ठीक आहे. मी त्या फॉरमॅटला फार महत्त्व देत नाही. पण हे फॉरमॅट असताना, तुम्ही तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी फिट असायला हवं. तुम्ही तिथे संघर्ष कशाला करता? कारण तुम्ही फक्त टी-20, आयपीएल आणि 50 ओव्हर्सवर लक्ष केंद्रीत करत आहात. आजकाल तर आम्ही 50 ओव्हर्सही खेळू शकत नाही. आपण असेच आहोत," अशी टीका योगराज सिंग यांनी केली. 

योगराज सिंग तितक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी प्रशिक्षक आणि प्रशासकांवरही ताशेरे ओढले आणि त्यांच्या इच्छाशक्तीची कमतरता असल्याची टीका केली. "सर्व प्रशिक्षक आणि प्रशासकांनी एअर कंडिशनमध्ये बसून गोष्टी करायच्या आहेत. इथे, मी 48 डिग्री सेल्सिअसमध्ये उभा राहून युवराज सिंगसारखे उत्तम क्रिकेटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे," अस ते म्हणाले.

Read More