Yograj Singh : भारता विरुद्ध इंग्लंड यांच्यात 20 जून पासून 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं आहे. विराट आणि रोहितने टेस्टमधून घेतलेली तडकाफडकी निवृत्ती आणि बीसीसीआयने शुभमनकडे (Shubman Gill) सोपवलेलं कर्णधारपद इत्यादींवरून योगराज सिंग (Yograj Singh) यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय.
मे महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्याआधी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या टेस्ट कारकिर्दीला पूर्णविराम देत निवृत्ती जाहीर केली. त्यामागोमाग 12 मे रोजी स्टार फलंदाज विराट कोहलीने सुद्धा टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला. आगामी इंग्लंड सीरिजपूर्वी टीम इंडियाचा दोन्ही दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती घेतल्याने संघाचं नेतृत्व कोणाकडे दिलं जाणार याबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या टेस्ट संघाची घोषणा करताना शुभमन गिलला भारताचा नवा टेस्ट कर्णधार म्हणून जबाबदारी दिली. तेव्हा सगळ्यावर बोलताना योगराज सिंग यांनी एका मुलाखतीत आपलं मत व्यक्त करून विराट रोहितला टोला सुद्धा लगावला आहे.
हेही वाचा : WTC जिंकण्यासाठी कायपण... धक्काबुक्की, धडपड, Killer Looks अन्...; मैदानातील खुन्नस कॅमेरात कैद Video
INSIDESPORT EXCLUSIVE
— InsideSport (InsideSportIND) June 13, 2025
YOGRAJ SINGH SAID:
“Virat & Rohit should have played for more 5 years in Test to make sure that the baton was passed to a youngster like Sourav Ganguly did. The baton has been thrown at Shubman Gill and not passed” pic.twitter.com/Al2VxHpXEN
विराट रोहितच्या निवृत्तीवर बोलताना योगराज सिंग म्हणाले की, 'विराट आणि रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला नको होती. मी रोहितला सकाळी 5 वाजता उठून 20 किमी धावायचा सल्ला दिला होता, जेणेकरून तो स्वतःला फिट ठेवू शकेल. विराट आणि रोहित अजून 5 वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतात. त्यांनी खेळायला हवे होते'.
योगराज सिंह पुढे म्हणाले की, 'रोहित आणि कोहली तरुणांना संघाची जबाबदारी देण्यात अपयशी ठरले. त्यांनी तरुणांना संघाची जबाबदारी सोपवली आहे हे पाहण्यासाठी तिथे असायला हवे. जसं सौरव गांगुलीने केलं होतं. शुभमन गिलकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही, तर गिलकडे कॅप्टन्सी फेकली गेली आहे', असं मत त्यांनी व्यक्त केलं.