Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025: 'ऋषभ पंतला 5 मिनिटात ठीक करेन...', युवराज सिंहच्या वडिलांचं पंतबाबत मोठं वक्तव्य

IPL 2025 : मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 27 कोटींची बोली लागून आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत आयपीएल 2025 मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.

IPL 2025: 'ऋषभ पंतला 5 मिनिटात ठीक करेन...', युवराज सिंहच्या वडिलांचं पंतबाबत मोठं वक्तव्य

IPL 2025 : आयपीए 2025 चं सीजन ऋषभ पंतसाठी अतिशय खराब ठरलं. मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 27 कोटींची बोली लागून आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पंतच्या नेतृत्वावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्याचा लखनऊ सुपर जाएंट्स संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. दिग्गज माजी क्रिकेटर योगराज सिंह (Yograj Singh) यांनी पंतच्या कमतरतेवर मोठं वक्तव्य केलं असून लखनऊच्या कर्णधाराला मी 5 मिनिटांमध्ये ठीक करेन असं त्यानं म्हटलं आहे. 

पंतला 5 मिनिटात ठीक करेन... :

न्यूज एजन्सी IANS ला दिलेल्या एका मुलाखतीत योगराज सिंहने ऋषभ पंतवर भाष्य केलं. ते म्हणाले की, ' त्याचं डोकं स्थिर राहत नाहीये आणि त्याचा डावा खांदा फलंदाजी करताना खूप जास्त उघडतो. त्यात थोडीशी सुधारणा व्हायला हवी आणि पंत एकदा पुन्हा त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेल. ऋषभ पंतने आयपीएल 2025 मध्ये केवळ 151 धावा केल्या असून 6 सामन्यात तर त्याच्या बॅटमधून केवळ 48 धावाच निघाल्या आहेत. ऋषभ पंतचा आयपीएल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट स्कोअर 63 धावा इतका होता, जो त्याने चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध बनवला होता. संपूर्ण सीजनमध्ये त्याने केवळ एक अर्धशतक ठोकलं. पंतचा स्ट्राईक रेट सुद्धा या सीजनमध्ये जवळपास 100 राहिला. 

हेही वाचा : IPL 2025 दरम्यान पंजाब किंग्समध्ये वाद, प्रीती झिंटा पोहोचली कोर्टात, 'या' प्रकरणात दाखल केला गुन्हा

LSG पंत सोबतचा करार करणार रद्द? 

पंतच्या खराब प्रदर्शनामुळे लखनऊ सुपर जाएंट्स पुढील वर्षी ऋषभ पंतला रिलीज करेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. परंतु या दाव्याचे पंतकडून खंडन करण्यात आले. यावर एक पोस्ट लिहीत पंतने म्हटले की, 'मला माहितीये खोट्या बातम्यांनी कंटेंटला जास्त रिच मिळतो, पण त्यालाच सर्व काही मानू नका. अजेंडा असणाऱ्या फेक बातम्यांपेक्षा थोडीशी समज आणि योग्य बातमी दिली तर खूप चांगले होईल. धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो. सोशल मीडियावर जे काही पोस्ट करता त्याबाबत थोडे जबाबदार आणि समजूतदार राहा'.  आयपीएल 2025 ला सुरुवात होण्यापूर्वी  लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका यांना त्यांच्या संघाकडून आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वावर मोठी आशा होती. ते म्हणाले होते की, 10 वर्षांनंतर पंतचे नाव एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांसोबत घेतले जाईल.

Read More