Yuvraj Singh Shocked and Emotional: फुटबॉलविश्वासाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फक्त 28 वर्षांचा असलेला पोर्तुगाल आणि लिव्हरपूल संघाचा स्टार फुटबॉलपटू डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचा स्पेनमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने केवळ फुटबॉलविश्वच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाजगत शोकसागरात बुडाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला आहे.
डियोगो जोटा याने गेल्या काही वर्षांत आपली ओळख एक हुशार, चपळ आणि अत्यंत प्रतिभावान खेळाडू म्हणून फुटबॉल विश्वात निर्माण केली होती. मैदानावर त्याची उपस्थिती म्हणजे एक वेगळाच जोश असायचा. त्याने लिव्हरपूलसाठी आणि पोर्तुगालसाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक कामगिरी केली होती. अलीकडेच त्याचे लग्न झाले होते. पण वैयक्तिक आयुष्यात हे नवे पर्व सुरू होऊन 10 दिवसच झाले असतांना काळाने त्याच्यावर घाला घातला. अशा वेळी त्याच्या आयुष्याचा असा अचानक अंत होणे हे खूपच वेदनादायी आहे.
हे ही वाचा: दुर्दैवी! लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनंतर कार अपघातात स्टार खेळाडूचे झाले निधन, भावाचाही झाला मृत्यू
या दु:खद घटनेवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हे ही वाचा: 'त्यांच्या खोलीत मुली पाठवता...', माजी क्रिकेटपटूने उलगडले IPLचे काळे रहस्य, म्हणाले 'पंजाब किंग्सला चॅम्पियन...'
युवराजने लिहिले, "विश्वास बसत नाही की डियोगो जोटा आता आपल्या सोबत नाही. तो एक असा खेळाडू होता, जो मैदानावर पाऊल टाकताच संपूर्ण खेळात ऊर्जा निर्माण करायचा. त्याचा खेळ हा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असायचा. तो केवळ खेळाडू नव्हता, तर एक प्रेरणास्थान होता. त्याचा भाऊ आंद्रे सिल्वाचाही याच अपघातात मृत्यू झाल्याचे ऐकून मन सुन्न झालं. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना खूप मोठी ताकद मिळो, हीच प्रार्थना. माझ्या मनःपूर्वक संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत."
Hard to believe Diogo is gone! He was a baller who brought the game to life every time he touched the pitch! One of the finest ever Condolences to the family, can't imagine the pain of losing not just Diogo, but his brother in the same accident. Strength to all who knew and… pic.twitter.com/pvfzjQ5QV4
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 3, 2025
युवराजसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूने अशा शब्दांत भावना व्यक्त केल्यावर त्याची पोस्ट काही काळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक क्रीडाप्रेमी आणि चाहते या पोस्टला उत्तर देत आपला शोक व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा: टीम इंडिया आणि IPLसाठी खेळून कर्णधार शुभमन गिल किती कमावतो? जाणून घ्या Net Worth
डिओगो जोटाचा खेळ, त्याचे कौशल्य आणि मैदानावरील आत्मविश्वास यामुळे त्याला फुटबॉलविश्वात एक विशेष स्थान प्राप्त झाले होते. त्याच्या अकाली निधनामुळे फुटबॉलच्या जगाला फार मोठा धक्का बसला आहे. ही रिकामी जागा सहजपणे भरून न निघणारी आहे.