Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोल्हापूर स्टाईलमध्ये युवी गौतम गंभीरला म्हणाला, 'भावा .... कुठाय?'

गौतमचा वाढदिवसाच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर, सुरेश रैना आणि आयपीएल टीमच्या

कोल्हापूर स्टाईलमध्ये युवी गौतम गंभीरला म्हणाला, 'भावा .... कुठाय?'

मुंबई : आज टीम इंडियाचा माजी सलामीचा बॅटसमन गौतम गंभीरचा ३९ वा वाढदिवस आहे. गंभीर दिल्ली पूर्वमधून खासदार देखील आहे. गौतमचा वाढदिवसाच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर, सुरेश रैना आणि आयपीएल टीमच्या कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.       युवराज सिंहने कोल्हापूर स्टाईलशी जुळणारा सवाल गौतम गंभीरला केला आहे... भावा केक कुठाय? युवराज सिंहने टवीट करून लिहिलं आहे. Waise cake kahan hai bhai?       गौतम गंभीरने सलग ५  कसोटी सामन्यांमध्ये शतक काढलं आहे. असा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटर आहे.      युवराजने ट्ववीट करून लिहिलं आहे, मिस्टर जी  या खास दिवसासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्ही अशीच समाजासाठी निस्वार्थ कामाची बॅटिंग करत राहा ही प्रार्थना, वैसे केक कहाँ हे भाई?

गौतम गंभीर हा मोठ्या मनाचा माणूस आहे, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एएसआय अब्दुल राशिद यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीरने घेतली आहे.        एवढंच नाही सूकमामध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या २५ सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून गौतम गंभीरने घेतली आहे.

Read More