Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

लाइव्ह मॅचमध्ये युझवेंद्र चहलने केली शिवीगाळ, विकेट घेतल्यावर दिली आक्रामक रिअ‍ॅक्शन; Video Viral

Yuzvendra Chahal Abuse: मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात युझवेंद्र चहलचा गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लाइव्ह मॅचमध्ये युझवेंद्र चहलने केली शिवीगाळ, विकेट घेतल्यावर दिली आक्रामक रिअ‍ॅक्शन; Video Viral

Yuzvendra Chahal Abuse Nicholas Pooran: मंगळवारी 1 एप्रिल रोजी, आयपीएल 2025 (IPL 2025) मधील लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात (LSG vs PBKS) सामना खेळवला गेला. एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. ऋषभ पंत, मिचेल मार्श आणि डेव्हिड मिलरसारखे प्रसिद्ध फलंदाजही मोठी धावसंख्या उभारण्यात दुर्दव्याने अपयशी ठरले. या सामन्यात, निकोलस पुरनने 30 चेंडूत 44 धावा उभारल्या. तो लखनौ संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात होता, मात्र त्याची विकेट घेऊन त्याला युझवेंद्र चहलने रोखले.

युझवेंद्र चहलने केली शिवीगाळ 

मार्कस स्टॉइनिसने टाकलेल्या 11व्या षटकात निकोलस पूरनने एक चौकार आणि एक दमदार षटकार ठोकला.  पुढचे षटक टाकायला युझवेंद्र चहल आला.  चहलने टाकलेल्या 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पुरणने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हवेत गेला. ग्लेन मॅक्सवेलने पुरणचा झेल घेत त्याला बाद केले. मॅक्सवेलने कॅच घेतल्यानंतर कॅमेरा चहलकडे वळला तेव्हा तो निकोलस पूरनला शिवीगाळ करताना दिसला.

हे ही वाचा: MS Dhoni: धोनी आयपीएलला तात्काळ अलविदा करणार? Viral पोस्टमुळे आलं चर्चेला उधाण

 

पंजाबसाठी चहलने मिळवली पहिली विकेट

आयपीएल 2025 या सिजनमध्ये युझवेंद्र चहलने पंजाब किंग्जकडून पदार्पण केले आहे. चहल गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. पण त्याने लखनऊविरुद्ध  निकोलस पूरनला बाद केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पंजाबकडून खेळताना चहलची ही पहिली विकेट ठरली. 

हे ही वाचा: शंका खरी ठरली! 'ही' सुंदरी चढली मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये, हार्दिकला नवीन प्रेम मिळालं?

 

बघा व्हायरल व्हिडीओ 

हे ही वाचा: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनला दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सर्वात यशस्वी गोलंदाज 

युझवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे आणि या लीगच्या इतिहासात 200 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा एकमेव गोलंदाज आहे. चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 206 विकेट्स घेतल्या आहेत. चहलने आरसीबीकडून खेळताना 139 तर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 66 बळी घेतले.

Read More