Chahal And Dhanashree Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि पूर्व पत्नी धनश्री वर्मा यांचा 20 मार्च रोजी घटस्फोट झाला. दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचं लग्न केवळ 18 महिने चाललं आणि त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नव्हतं त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहत होते. अखेर मुंबई कौटुंबिक न्यायालयाने मागील आठवड्यात या दोघांच्या घटस्फोटावर निर्णय दिला आणि दोघे विभक्त झाले. मात्र युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) या दोघांचा घटस्फोट नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे कळू शकलं नव्हतं. परंतू आता याचं कारण समोर आलं आहे.
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट का झाला याबाबत अनेक कारण समोर येत होती. मात्र नुकतंच वरिष्ठ पत्रकार विक्की लालवानी याने चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच कारण सांगितलं आहे. विक्की लालवानीच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार युजवेंद्र आणि धनश्री यांच्या घटस्फोटाचं कारण मुंबई होतं. धनश्रीला मुंबईला राहायची इच्छा होती, आणि तिने युजवेंद्रला हरियाणातील आपलं घर सोडून मुंबईला शिफ्ट होण्यासाठी सांगितलं होतं. विक्की लालवानीने सांगितलं की चहल आणि धनश्री हे दोघे वेगवेगळे पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्ती होत्या. सूत्रांच्या सांगण्यानुसार चहल आणि धनश्री यांच्यात जास्त पटायचं नाही. धनश्रीला मुंबईला कायमस्वरूपी शिफ्ट व्हायचं होतं पण युजवेंद्रला हे मान्य नव्हतं. युजवेंद्रला त्याचे आई वडील आणि कुटुंबासोबत हरियाणाच्या राहायचे होते. या दोघानावरून त्यांच्यात बरेच वाद सुद्धा झाले.
हेही वाचा : IPL 2025: 'अर्जुन तेंडुलकरला तुम्ही वाया घालवत आहात'; योगराज सिंग स्पष्टच बोलले, 'कुठे त्याला बॉलिंग...'
पत्रकार विक्कीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला की, लग्न झाल्यावर धनश्री आणि चहल हरियाणा येथे त्याच्या आईवडिलांसोबत राहायला गेले होते. गरज पडल्यावर ते मुंबईला यायचे. मुंबई - हरियाणा चा वाद हे दोघांच्या घटस्फोटाचं मुख्य कारण ठरलं. युजवेंद्र चहलने सांगितलं होतं की तो आई वडील आणि कुटुंबाला सोडून कायमस्वरूपी मुंबईला येणार नाही.
घटस्फोट झाल्यावर धनश्रीला युजवेंद्रकडून 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले आहेत. कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार चहल आणि धनश्री हे दोघे 2020 मध्ये लग्न बंधनात अडकले. परंतु त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट नव्हते त्यामुळे 2022 पासून ते वेगळे राहतायत. अखेर काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तसेच हायकोर्टाने त्यांचा सहा महिन्यांचा कुलिंग पिरिएड सुद्धा माफ केल्याने त्यांच्या घटस्फोटावर लवकर निर्णय झाला त्यांचा घटस्फोट 20 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे निश्चित झाला.