Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीने असं केलं सेलिब्रेशन

आयपीएल 2020 (IPL 2020) च्या तिसऱ्या सामन्यात आरसीबीने सनरायजर्स हैदराबादचा 10 रनने पराभव केला.

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीने असं केलं सेलिब्रेशन

मुंबई : आयपीएल 2020 (IPL 2020) च्या तिसऱ्या सामन्यात आरसीबीने सनरायजर्स हैदराबादचा 10 रनने पराभव केला. यात विजयाचा हिरो युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) होता. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीमने विजय मिळवला.

चहलने 3 विकेट घेत टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हैदराबादचा संघ चांगली कामगिरी करत असताना चहलने विकेट घेत हैदराबाद संघाला रोखलं. यासाठी चहलला 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्ड देखील मिळाला.

आरसीबीच्या विजयानंतर फॅन्सने आनंद साजरा केला. त्यातच युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma)ने देखील वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन केलं. युजवेंद्र चहलला ट्रॉफी मिळत असताना तिने डान्स करत आनंद साजरा केला.

टीम इंडियाचा बॉलर युजवेंद्र चहल आणि मशहूर डांसर आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला आहे.

Read More