टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली त्याची एक्स-पत्नी धनश्री वर्मा यांचं लग्न अगदी गाजावाजा करून झालं होतं. पण ते नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांचा 20 मार्च रोजी त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला, तेव्हा चहलने कोर्टातून बाहेर पडताना घातलेली एक टीशर्ट चर्चेचा विषय ठरला होता. याचं कारण होतं "Be Your Own Sugar Daddy" असं त्या टी-शर्टवर लिहलेलं शब्द. पण चहलने असं का लिहलं यावर आता त्याने स्वतः सांगितलं आहे.
माध्यमांशी चहलने काहीच बोलणं टाळलं, पण त्याच्या त्या टीशर्टने अनेक गोष्टी सांगून गेल्या. सोशल मीडियावर तो टीशर्ट एक प्रकारचा 'टोमणा' म्हणून पाहिला गेला. अनेकांनी धनश्रीला 'गोल्ड डिगर' असे म्हणायला सुरुवात केली. आता चार महिन्यांनंतर चहलने एका पॉडकास्टमध्ये त्या टी-शर्टवर असं का लिहलेलं यावर भाष्य केलं आहे.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने स्पष्ट केलं की त्या दिवशी टीशर्ट घालणं हा एक विचारपूर्वक निर्णय नव्हता, पण काही गोष्टी झाल्यामुळे त्याने त्या प्रकारे स्वतःचा रोष व्यक्त केला होता. तो म्हणाला, "माझा मूळ हेतू नव्हता, पण जेव्हा काही गोष्टी घडल्या, तेव्हा मला वाटलं की आता माझं स्पष्टपणे मत मांडायला हवं. मी काही अपशब्द वापरले नाहीत, फक्त संदेश द्यायचा होता," असं चहल म्हणाला.
घटस्फोटाचं सेटलमेंटही काहीसं गाजलं. चहलने खुलासा केला की त्याने धनश्रीला 4.75 कोटी रुपये अलिमनी दिले. त्याने म्हणलं की, “ती डील माझ्यासाठी कठीण होती, पण तीच डील पुढे जाऊन या नात्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक होती.”
चहलने कबूल केलं की, जरी नातं आतून ताणलेलं होतं, तरी दोघांनीही सोशल मीडियावर कोणताही संकेत दिला नाही. जेव्हा विचारलं गेलं की, "तुम्ही बाहेरून खोटं नातं दाखवत होतात का?" चहलने यावर सरळ उत्तर दिलं, "हो."
‘शुगर डॅडी’ हा शब्द सामान्यतः अशा श्रीमंत पुरुषांसाठी वापरला जातो, जे तरुण मुलींना महागड्या भेटवस्तू, ट्रिप्स किंवा आर्थिक मदतीच्या बदल्यात नातं देतात. पण चहलने घातलेला टीशर्ट "Be Your Own Sugar Daddy" म्हणजेच "स्वतःचं आर्थिक स्वावलंबन स्वतःच व्हा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका" असा संदेश देणारा होता.