Yuzvendra Chahal Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी कामगिरीमुळं चर्चेत असतानाच या स्पर्धेसाठी संघाचा भाग नसूनही गोलंदाज युझवेंद्र चहल याचीसुद्धा चर्चा सुरु आहे. युझी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे (Champions Trophy 2025) क्रिकेट सामन्यातील प्रेक्षक गॅलरीतून व्हायरल झालेले त्याचे काही फोटो.
चहल भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना पाहण्यासाठी दुबई इथं पोहोचला होता. जिथं त्याच्यासोबत एक खास व्यक्ती सर्वच कॅमेरांचं लक्ष वेधून गेली. ही तिच तरुणी होती जिच्यासोबत कथित स्वरुपात मागील काही दिवसांपासून चहलचं नाव जोडलं जात होतं. आरजे महवश असं याक तरुणीचं नाव असून चहलचं आणि तिचं नेमकं नातं काय, याचे अनेक तर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून लावण्यात आले. यादरम्यानच चहलची (पूर्वाश्रमीची) पत्नी धनश्री वर्मा हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक असं पाऊल उचललं की पाहणाऱ्यांचे डोळे चक्रावले.
घटस्फोटाच्या बातम्यांच्या चर्चेमध्येच धनश्रीनं तिच्या इन्स्टा अकाऊंटमधाल फोटो अनआर्काइव्ह केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार धनश्रीनं युझीसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर त्याच्यासोबतचे सर्व फोटो तिच्या इन्स्टा फीडमधून हटवले होते. पण, आता मात्र तिच्या इन्स्टा वॉलवर हे फोटो पुन्हा दिसत आहेत. ज्यामुळं नेटकरीसुद्धा पेचात पडले आहेत. धनश्री आणि युझवेंद्रच्या नात्यात नेमकं काय सुरुये, हे नातं त्यांना कोणत्या वळणावर घेऊन आलंय? हाच प्रश्न नेटकरी आणि या दोघांचेही फॉलोअर्स उपस्थित करत आहेत.
धनश्रीनं सोशल मीडियावर चहल आणि महवशचे फोटो व्हायरल झाल्यानंतर एक बोलकी पोस्टही केली होती. ज्यामध्ये तिनं लिहिलेलं, 'महिलांना कायम दोष देणं ही एफ फॅशनच झाली आहे'. धनश्रीची ही पोस्ट पाहता ती नेमकी काय सांगू इच्छिते याचाच तर्क अनेजण लावताना गिसले. दरम्यान या साऱ्यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या क्रिकेटपटूसोबतचं तिचं नातं, या नात्यातील दुरावा आणि त्यानंतरच्या सर्व लहानमोठ्या घडामोडी जोडण्याचं सत्र नेटकऱ्यांनी सुरू केलं. यातच युझवेंद्रकडून तिनं 60 कोटींची पोटगी घेतल्याचा दावा आणि त्यानंतर कुटुंबीयांकडून हा दावा फेटाळून लावण्याची भूमिकासुद्धा केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं.