Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तुझ्या सोबत आमचं हृदय सुद्धा...' सिराजसाठी आशा भोसलेंच्या नातीची खास पोस्ट, अफेअरच्या रंगल्या होत्या चर्चा

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान शेवटचा टेस्ट सामना खेळवला गेला. यात शेवटच्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवला.  यात मोहम्मद सिराजने केलेल्या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

'तुझ्या सोबत आमचं हृदय सुद्धा...' सिराजसाठी आशा भोसलेंच्या नातीची खास पोस्ट, अफेअरच्या रंगल्या होत्या चर्चा

IND VS ENG Test : भारताने इंग्लंड टेस्टमध्ये रोमांचक विजय मिळवला. भारताच्या हैदराबादमधील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) या सामन्यात 9 विकेट घेतल्या. इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर असताना मोहम्मद सिराजनेच भारताला इंग्लंडची शेवटची विकेट मिळवून दिली. त्यामुळे भारत इंग्लंड विरुद्धची सीरिज 2-2 अशा बरोबरीत सोडवू शकला. मोहम्मद सिराजच्या कामगिरीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक केलं जात असतानाच प्रसिद्ध जेष्ठ गायिका आशा भोसले यांची नातं जनाई भोसले (Zanai Bhosle) हिने मोहम्मद सिराजबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जनाई आणि सिराज यांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

मोहम्मद सिराजने लगावलं विकेटचं शतक : 

मोहम्मद सिराजने पाचव्या टेस्ट सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार सुद्धा मिळाला. पण एवढंच नाही तर मोहम्मद सिराजने संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली आणि तब्बल 23 विकेट घेतल्या. यासह त्याने सोमवारी इंग्लंडची शेवटची विकेट घेऊन टेस्ट क्रिकेटमधील १०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. 

मोहम्मद सिराजसाठी जनाई भोसलेची पोस्ट : 

जनाई भोसले हिने मोहम्मद सिराजसाठी इंस्टाग्रामवर अनेक स्टोरी शेअर केल्या. यातील एका स्टोरीमध्ये तिने लिहिले की, 'जेव्हा कुठलीही गोष्ट चांगली घडत नाही तेव्हा जादू (Majic) घडते'. दुसऱ्या स्टोरीत तिने लिहिलं की, 'मी स्वतःला थांबवू शकत नाहीये. मला तुमच्यावर इतका गर्व वाटतोय'. अजून एक पोस्ट शेअर  करून जनाईने लिहिले की, 'सिराज भाईला जेव्हा पासून मी भेटले आहे, मला फक्त त्यांच्या नीतिमत्तेमधून आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेरणा मिळाली आहे! तो असा आहे जो तुम्हाला खरोखर जादूवर विश्वास ठेवायला लावतो. मला शब्द कमी पडतायत, मला सुचत नाहीये काय बोलावं पण तुमच्या सारखं कोण नव्हतं, आणि नाही असेल. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आणि आपल्या सर्वांच्या हृदयाचे ठोके तुमच्यासोबत भारतासाठी धडधडतात'. 

fallbacks

अफेअरच्या रंगल्या होत्या चर्चा : 

जनाई आणि सिराज यांचे एकत्र काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र जनाई आणि सिराजने स्वतः सोशल मीडिया पोस्ट लिहून या चर्चांचे खंडन केले होते. जनाई भोसले आणि मोहम्मद सिराज या दोघांनीही पुन्हा आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्य फोटो शेअर करून आपण भाऊ-बहिण असल्याचं म्हटलं होतं. "माझ्या प्रिय भावा (Mere Pyaare Bhai)" अशी कॅप्शन देत जनाईने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर केला होता. यानंतर मोहम्मद सिराजनेही इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत लिहिलं होतं की, "माझ्या बहिणीसारखी कोणी बहिण नाही. हिच्याशिवाय मला कुठे राहायचं नाही. जसा चंद्र ताऱ्यांमध्ये आहे, तशी माझी बहिण हजारोंमध्ये आहे (No is like my sister, I don’t want to live without her. Just like the moon and stars, my sister is one of a kind)".

अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत सुटली : 

टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 396 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. पण दिवस संपल्याने सामना थांबवण्यात आला होता. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. त्यामुळे भारताने 6 धावांनी सामना जिंकला. 

Read More