Marathi News> टेक
Advertisement

या '३' पद्धतीने घरबसल्या आधार-सिम लिंक करा

मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे.

या '३' पद्धतीने घरबसल्या आधार-सिम लिंक करा

नवी दिल्ली : मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे. मात्र अजूनही तुम्ही हे सिम आधारशी कनेक्ट केले नसेल तर काळजी करू नका. घरबसल्याही अगदी पाच मिनीटात तुम्ही हे काम करू शकता. याचे तीन मार्ग सरकारने दिले आहेत.

OTP ने करा आधार कार्ड लिंक 

ज्यांचा मोबाईल नंबर पहिल्यापासूनच आधारला कनेक्ट आहे. ते ओटीपीच्या साहाय्याने अगदी सहज सीम देखील आधारला कनेक्ट करू शकतात. कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅप मधून देखील हे काम ५ मिनीटात होईल. वेबसाईटवर रजिस्‍ट्रेशननंतर एक ओटीपी येईल. या ओटीपीच्या साहाय्याने तुम्ही सीम आधारला लिंक करू शकता.

आयव्हीआरएस व्हेरिफिकेशन 

इंटरेक्टिव वॉयस रिस्‍पॉन्‍स सिस्‍टम (आयव्हीआरएस) च्या मदतीने तुम्ही सीम लिंक करू शकता. यासाठी देखील तुम्हाला कंपनीची वेबसाईट किंबा विशेष अॅपमध्ये रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर सॉफ्टवेअर ग्राहकांची ओळख पटल्यावर सीम आधारला लिंक करू शकता.

एजेंट देईल घरपोच सेवा

तिसरा पर्याय हा आहे की, तुम्ही एजेंटला घरी बोलावू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवर आवेदन करावे लागेल. त्यानंतर एजेंट घरी येऊन आधार मोबाईलला लिंक करेल. 

ही आहे शेवटची तारीख

मोबाईल आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे. 

 

Read More