BYD Atto 3 Safety Rating: भारतात दरवर्षी हजारो लोकांचा बळी रस्ते अपघातात जातो. वाहनांचा वेग, कारमधील अपुरी सुरक्षा उपकरणं, रस्त्यांची स्थिती यामुळे अपघात होतात. ही स्थिती पाहता सरकारनं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कायदे कडक केले आहेत. तसेच ऑटो कंपन्यांना कार सेफ्टी फीचर्स देण्याची ताकीद दिली आहे. आता चायना ऑटोमेकर कंपनी BYD (Build Your Dreams) कंपनीने BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. BYD Atto 3 सात एअरबॅग्ज, सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, ISOFIX अँकरेज आणि ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन असिस्ट, स्पीड असिस्ट सिस्टम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग यासारखे फीचर्स आहेत. एवढेच नाही तर BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV ला Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Euro NCAP ने BYD Atto 3 च्या बेस ऍक्टिव्ह व्हेरियंटची चाचणी केली आहे.
या कारला 38 पैकी 34.7 गुण मिळाले आहेत. इलेक्ट्रिक SUV ने गंभीर बाजूच्या पोल चाचणी दरम्यान ड्रायव्हरच्या छातीच्या भागाला गंभीर दुखापत झाली. मात्र ही तीव्रता तितकी नव्हती. तसेच बाल संरक्षण चाचणीत 49 पैकी 44 गुण मिळाले. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चाचणीत Atto 3 ने 72 पैकी 37.5 (69 टक्के) गुण मिळवले. गाडीच्या किंग आणि लेन सपोर्ट सिस्टमने बहुतेक चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली. सेफ्टी असिस्ट सिस्टीममध्ये 16 पैकी 12 गुण मिळाले.
The launch of the premium electric SUV, BYD ATTO 3, was a huge success
— BYD (@BYDCompany) October 13, 2022
Through proven innovation and technology, we are on track toward building a stronger ecosystem that facilitates EV adoption in India. #BuildYourDreams #BYDATTO3 #ElectricVehicle pic.twitter.com/A91niyfkCY
गिझर आणि एसी वापरूनही विजेचं बिल येणार कमी, फक्त हे छोटं डिव्हाईस करणार कमाल!
नवीन BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV ची 50,000 रुपयांची टोकन रक्कम भरून ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपकडून बुक केली जाऊ शकते. नवीन मॉडेलच्या किमती अद्याप जाहीर केल्या नाहीत. असं असलं तरी नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर केल्या जातील आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीस वितरण सुरू होईल. या कारची किंमत 30 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे.