7 Seater Car Options In India: भारतीय ग्राहकांमध्ये एमपीव्ही गाड्यांची मागणी दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा भविष्यात एमपीव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरु शकते. एपीव्ही कारमध्ये सध्या मारुती सुझुकी अर्टिगा, रेनॉल्ट ट्रायबर आणि किआ कॅरेन्ससारख्या दमदार एमपीव्ही लोकप्रिय आहेत. विक्रीबद्दल बोलायचं झालं तर मारुतीची सुझुकी अर्टिगा सातत्याने मागील काही काळापासून पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये देशातील पहिल्या क्रमांकाची सेव्हन सीटर कार रेनॉल्ट ट्रायबरचाही समावेश आहे. या दोन्ही एमपीव्हीचे फिचर्स आणि इतर वैशिष्ट्ये काय आहेत.
मारुती सुझुकी अर्टिगामध्ये 1.5 लीटरचं ड्युअल जेट पेट्रोल इंजिन, माइल्ड हायब्रिट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. कारचं इंजिन 103 बीएचपीच्या सर्वाधिक पॉवर चालतं. हे इंजिन 136.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मारुती अर्टिगामध्ये पेट्रोल मॅन्युअर व्हेरिएंट 20.51 किलोमीटर प्रती लिटर इतकी आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटची रेंज 20.30 किलोमीटर प्रती लिटर इतकी आहे. त्याचप्रमाणे सीएनजी पॉवर ट्रेनसहीत येणारं व्हेरिएंट 26.1 किलोमीटर प्रती किलो इतकी रेंज देणारं आहे.
पॉवर ट्रेनचा विचार केला तर रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 1.0 लीटर नॅचरल अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. कारमध्ये इंजिन 71 बीपीएच पॉवर आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे. कारमध्ये इंजिनला 5 मॅन्युअल आणि 5 स्पीट ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आलं आहे. कंपनी रेनॉल्ट ट्रायबर 18 ते 19 किलोमीटरचं मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
इंटीरिअरबद्दल बोलायचं झालं तर मारुती सुझुकी अर्टिगामध्ये मध्ये अँड्रॉइड ऑटो अँड अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी देण्यात आली. या कारमध्ये 7 इंचांची स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. क्रूज कंट्रोलबरोबरच ऑटो एसीसारखे फिचर देण्यात आले आहेत. याशिवाय सेफ्टीसाठी कारमध्ये ड्युएल एअरबॅग, एबीएस तंत्रज्ञान, ब्रेक असिस्ट आणि रेअर पार्किंग सेन्सरसारखे फिचर देण्यात आले आहेत. मारुती सुझुकी अर्टिगाची एक्स शोरुममधील किंमत 8.96 लाख रुपयांपासून होते. टॉप एण्ड मॉडेलची किंमत 13.26 लाखांपर्यंत आहे.
रेनॉल्ट ट्रायबरच्या इंटीरिअरमध्ये ऑटो अँड अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी असलेली 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवायर कारच्या केबिनमध्ये ग्राहकांना 7 इंचांचा डिजिटल ड्राइव्ह डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, स्टीअरिंग माऊंटेड कंट्रोल, एसी व्हेंट्स, पुश बटन स्टार्ट-स्टॉप आणि सेंटर कंन्सोलमध्ये कोल्ड स्टोरेजसारखे फिचर देण्यात आले आहेत. सुरेक्षबद्दल बोलायचं झालं तर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यातमध्ये 4 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमबरोबर रेअर सेन्सर पार्किंग देण्यात आलं आहे. रेनॉल्ट ट्रायबरची किंमत 6.13 लाखांपासून सुरु होते आणि टॉप एण्ड मॉडेल 9.03 लाखांना आहे.