Marathi News> टेक
Advertisement

मोबाईल कंपनीची ऑफर, युझर्सला मिळणार २००० रुपयांचा फायदा

३१ ऑक्टोबर २०१८ पूर्वी तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल

मोबाईल कंपनीची ऑफर, युझर्सला मिळणार २००० रुपयांचा फायदा

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत वेगवेगळ्यां कंपन्यांकडून ऑफर्सची उधळण केली जातेय... अशीच एक धमाकेदार ऑफर टेलिकॉम कंपनी एअरटेलनंही आपल्या करोडो ग्राहकांसाठी सादर केलीय. या फेस्टिव्ह ऑफरमध्ये एअरटेलनं आपल्या युझर्सचा २००० रुपयांचा फायदा करण्याचा दावा केलाय. पण ही ऑफर केवळ त्याच युझर्ससाठी आहे जे नवीन 4G स्मार्टफोन खरेदी करतील. 

एअरटेलनं आपल्या ग्राहकांना नवा 4G स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर २००० रुपयांचा कॅशबॅक देण्याची घोषणा केलीय. ही कॅशबॅक एअरटेल मोबाईल अॅप 'MyAirtel' द्वारे ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना कॅशबॅक कूपनच्या स्वरुपात मिळेल. युझर्सच्या अकाऊंटमध्ये ४० कुपन जमा केले जातील. यातील प्रत्येक कुपनची किंमत ५० रुपये असेल. या डिजिटल कुपनचा वापर १९९ किंवा त्यापेक्षा जास्त प्रीपेड रिचार्जसाठी करता येईल. 

लक्षात ठेवा, रिचार्ज करताना एका वेळी एकच कुपन वापरता येईल. 

ही ऑफर प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला ३१ ऑक्टोबर २०१८ पूर्वी तुमच्या 4G हॅन्डसेटमध्ये एअरटेलचं 4G सिम टाकावं लागेल. त्यानंतर आपोआप तुमच्या अकाऊंटमध्ये २००० रुपयांचा कॅशबॅक म्हणजेच डिजिटल कुपन जमा होतील.

हे डिजिटल कुपन ४० महिन्यांपर्यंत वैध असतील. या कॅशबॅक ऑफरचा लाभ माय एअरटेल अॅप, एअरटेल TV आणि विंक म्युझिकद्वारे मिळेल.  

Read More