Airtel offers: एअरटेलने अलीकडेच त्यांच्या 38 कोटींहून अधिक मोबाइल यूजर्ससाठी 2 नवीन प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये यूजर्सना अनलिमटेड कॉलिंग, डेटा आणि ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. एअरटेलच्या या 3 एंटरटेन्मेंट प्लॅन व्यतिरिक्त असे अनेक स्वस्त प्लॅन आहेत ज्यात यूजर्सना जास्त व्हॅलिडिटी दिली जाते.
एअरटेलकडे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह एक प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह बरेच फायदे दिले जातात. एअरटेलच्या 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊया. ज्यामध्ये यूजर्सना डेटा देखील मिळतो.
भारती एअरटेलचा हा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन 2249 रुपयांच्या किमतीत येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण 365 दिवसांसाठी अनलिमटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यामध्ये यूजर्सना मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा देखील मिळतो. वापरकर्ते संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तसेच यूजर्सना दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळेल.
यासोबतच या योजनेत एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि हॅलो ट्यून्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. इंटरनेट डेटाबद्दल जाणून घेऊया. एअरटेल या योजनेत एकूण 30 जीबी हाय स्पीड डेटा देते. त्यामुळे यूजर्स कोणत्याही डेली लिमिटशिवाय हा डेटा वापरू शकतात.
एअरटेलच्या सर्वात स्वस्त 365 दिवसांच्या प्लानबद्दल जाणून घेऊया. या प्लानसाठी तुम्हाला 1849 रुपये मोजावे लागतात. भारती एअरटेलने या वर्षाच्या सुरुवातीला ट्रायच्या आदेशानुसार हा प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन विशेषतः 2जी फीचर फोन यूजर्ससाठी आणण्यात आलाय.
या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण भारतात कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळतो. यासोबतच यूजर्सना 3600 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा दिला जात नाही. यूजर्स डेटासाठी वेगळा अॅड-ऑन प्लॅन घेऊ शकतात.