Marathi News> टेक
Advertisement

अमेझॉनचा फेस्टिव्हल धमाका; मोबाईल, लॅपटॉपवर भरघोस सूट

अमेझॉनचा हा दिवाळी धमाका २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे

अमेझॉनचा फेस्टिव्हल धमाका; मोबाईल, लॅपटॉपवर भरघोस सूट

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'अमेझॉन'चा फेस्टिव्हल सीझन सेल आजपासून सुरू होतोय. पुढच्या चार दिवसांपर्यंत या सेलचा धमाका सुरू असेल. उल्लेखनीय म्हणजे, हा अमेझॉनचा यंदाचा तिसरा दिवाळी सेल आहे.

'अमेझॉन'ची प्रतिस्पर्धी कंपनी 'फ्लिपकार्ट'नं यापूर्वीच म्हणजे १ नोव्हेंबर रोजी दिवाळी सेलला सुरुवात केलीय. 

अमेझॉनचा हा दिवाळी धमाका २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 

यावेळी अमेझॉन इंडियानं एचडीएफसी बँकेसोबत हातमिळवणी केलीय. यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना १० टक्क्यांची सूट मिळणार आहे. तसंच युझर्सना 'ईएमआय' ऑप्शनही उपलब्ध होईल. 

इतकंच नाही तर, तुम्ही २००० रुपयांपासून ४,९९९ रुपयांपर्यंत शॉपिंग केली तर तुम्हाला वेगळा ५ टक्क्यांचा कॅशबॅकही मिळेल. तर ५००० रुपयांपेक्षा जास्त शॉपिंग केली तर १० टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक तुमच्या अमेझॉन पे बॅलन्समध्ये जोडला जाईल. 

तसंच ५०० रुपयांपेक्षा जास्त शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना BookMyShow आणि Swiggy चे वाऊचर्सही मिळतील

नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि नव्या कस्टमर्सना पहिल्या ऑर्डरवर फ्री डिलिव्हरी देणार मिळणार आहे. 

या शॉपिंग सेलमध्ये Redmi 6 Pro, Samsung Galaxy A8+ आणि Realme 1 या स्मार्टफोनवर दमदार डिस्काऊंट मिळतील. तर लॅपटॉपवर तब्बल २५,००० रुपयांपर्यंतचे ऑफर्स मिळतील. 

सोबतच कॅमेरा, ऑडिओ, हेडफोनवर ७० टक्क्यांचा डिस्काऊंट मिळेल.  
 

Read More