Marathi News> टेक
Advertisement

Apple उत्पादनांच्या किंमतीत घट; परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च होणार iPad

काही दिवसांपूर्वी ऍपलने स्वस्त दरातील आयफोन (iPhone) लॉन्च करण्यााबाबत सांगितलं होतं. 

Apple उत्पादनांच्या किंमतीत घट; परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च होणार iPad

नवी दिल्ली : लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये बदल होत असल्याचं दिसू शकतं. त्यापैकी एक म्हणजे ऍपलचे फोन आणि आयपॅड. काही दिवसांपूर्वी ऍपलने स्वस्त दरातील आयफोन (iPhone) लॉन्च करण्यााबाबत सांगितलं होतं. त्यानंतर आता ऍपल बाजारात स्वस्त, परवडणाऱ्या किंमतीत आयपॅड (iPad) आणणार आहे.

ऍपलचे विख्यात विश्लेषक मिंग-ची कू यांनी दावा केला आहे की, आयफोन निर्माता कंपनी परवडणाऱ्या दरातील 10.8 इंची आयपॅड (iPad) तयार करत आहे. हा आयपॅड या वर्षाच्या उत्तरार्धात अर्थात पुढील 6 महिन्यांमध्ये येऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय 8.5 आणि 9 इंचीदरम्यान एका नवा मिनी, लहान आकाराचा आयपॅड 2021 वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात लॉन्च होऊ शकत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

मिंग-ची कू यांनी सांगितलं की, हे दोन नवीन आयपॅड मॉडेल्स आयफोन एसईच्या उत्पादन धोरणाचं अनुसरण करतील, म्हणजेच आयफोन एसईप्रमाणे स्वस्त दरात असतील. मिंग-ची कू यांनी, नवीन 10.8 इंची आयपॅड आणि 8.5 ते 9 इंची असणारे आयपॅडचे मिनी मॉडेल्स लवकरच बाजारात आणले जातील असा अंदाज वर्तवला आहे. 

मिंग-ची कू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍपल 2020मध्ये लवकरच Apple high resolution glassesही बाजारात आणणार आहे. मॅकरुमर्सच्या रिपोर्टनुसार, Apple glasses हाय रिझोल्युशन असणार, यामुळे आयफोन अधिक पातळ आणि हलका होऊ शकतो. हा नवा ग्लॉस नव्या IOS च्या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या ग्लॉसमध्ये मल्टी लेयर असल्याने याला बनवण्याची प्रक्रिया अतिशय मोठी आणि खर्चिक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Read More